औरंगाबाद महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ

औरंगाबाद राजकारण
Spread the love

औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्

औरंगाबाद/प्रतिनिधी
महापालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी मंगळवारी (दि.31) रोजी पालिकेच्या मुख्य सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली असून राजेंद्र जंजाळ हे 51 मते घेऊन विजयी झाले आहेत. भाजप पुरस्कृत गोकुळ मलके 34 तर एमआयएमच्या जफर बिल्डर यांना 13 मते पडली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या जंजाळ यांना मतदान केले.

महापालिकेत भाजप सेनेची युती पाणीपुरवठा योजनेला स्थगितीच्या मुद्द्यावरून तुटली. निषेधार्थ भाजपच्या उपमहापौरांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी पालिकेच्या मुख्य सभागृहात सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. दरम्यान, सकाळी पावणे अकरा वाजता शिवसेनेचे नगरसेवक एकत्रित ट्रॅव्हलसमधून पालिकेत दाखल झाले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, सचिन खैरे यांच्यासह सदस्यांनी महाविकास आघाडीचा विजय असो अशा जोरदार घोषणाबाजी करत सभागृहाच्या दिशेने गेले. यांच्यापाठोपाठ भाजपचे सदस्य पालिकेत आले. मात्र, यावेळी भाजपच्या सदस्यांमध्ये शांतता दिसली. सभागृहात पाहिले 15 मिनिटे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ, एमआयएमचे जफर बिल्डर आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार गोकुळ मलके रिंगणात राहिले. मतदान प्रक्रियेत जंजाळ यांना 51 मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तर मलके यांना 34 तर जफर बिल्डर यांना 13 मते मिळाली. पालिकेच्या प्रवेशद्वारावर फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एकूण शंभर सदस्य हजर होते. त्यातील 98 मतदान झाले तर
काँग्रेसचे दोन सदस्य तटस्थ राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *