परळीच्या औद्योगीक विकासाची वाटचाल सुरु-चंदुलाल बियाणी

ई पेपर बीड

 

*परळी (प्रतिनिधी-)*

परळी औद्योगीक वसाहत निर्मितीच्या पार्श्वभुमीवर आ. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांची भेट घेऊन सिरसाळा येथील नियोजित औद्योगीक वसाहतीच्या भूसंपादनाच्या कार्यवाहीसाठी आज गती दिली आहे. परळीत होणारी औद्योगीक वसाहत भविष्यातील उद्योजक तयार होण्यासोबत रोजगारांची मोठी संधी मिळणार आहे. आ. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आज परळीच्या औद्योगीक विकासाची वाटचाल सुरु झाली आहे अशी प्रतिक्रीया मराठवाडा व्यापारी महासंघाचे विभागीय कार्याध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली.

औद्योगीक वसाहतीची परळीकरांची मागणी अत्यंत जुनी व तेवढीच महत्वपुर्ण आहे. मागील अनेक वर्षापासून परळीकर औद्योगीक वसाहतीसाठी प्रयत्नशील असतांना आ. धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्षनेते असतांना व आता विधानसभेत आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर लगेचच औद्योगीक वसाहतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. औद्योगीक वसाहतीकरीता 96.65 हेक्टर आर. जमीन तात्काळ संपादीत करण्याचे आदेश आज उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई व आ. धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर देण्यात आले आहेत. या औद्योगीक वसाहतीमुळे परळीत नविन उद्योजक तयार होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधीही येथे मिळणार आहे. परळीत होत असलेली औद्योगीक वसाहत अत्यंत महत्वाचा निर्णय असून औद्योगीक विकासाची वाटचाल सुरु झाल्याने समाधान वाटते असेही मत चंदुलाल बियाणी यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *