तेलगाव येथील चोरी प्रकरणी चोरट्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

ई पेपर बीड
Spread the love

दिंद्रुड प्रतिनिधी।
दिंद्रुड पोलिस हद्दीतील तेलगाव येथील स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल दहा दुकानात चोऱ्या होऊन,मोठा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणाचा दिंद्रुड पोलीसांनी वेगाने तपास करून दोन पैकी एका चोरट्यास अटक करून धारूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील मध्यवर्ती व दळणवळणाचे ठिकाण असलेल्या तेलगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 c धारूर रोड लगत असलेल्या स्व तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल दहा दुकानात दि.6 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री चोरीच्या घटना घडल्या होत्या. तब्बल दहा दुकानात चोऱ्या झाल्याने तेलगावसह परिसरात एकच खळबळ उडाली होती. या चोरीच्या घटनेचा तपास करणे दिंद्रुड पोलीसांसमोर मोठे आवाहन होते. चोऱ्यांच्या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर कांही दिवसांपुर्वी बीडच्या गुन्हे तपास पथकाने दादा बब्रुवान पवार वय 35वर्षे यास एका गुन्ह्यात अटक केले होते. या आरोपीस दि.3डिसेंबर रोजी दिंद्रुड पोलीसांनी चौकशी करिता ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे दिंद्रुड पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्या आरोपीने तेलगाव येथे झालेल्या चोऱ्यांची कबुली देत आपल्यासह आपल्या अन्य एका सहकाऱ्याच्या मदतीने तेलगाव येथील स्व तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील दुकानात चोऱ्या करून, येथील आठ दुकानातील विविध सामानासह रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली. यात दिंद्रुड पोलीसांनी दादा बब्रुवान पवार यांच्या कडून 2Lcd ,1 नॅनो बॅटरी, 1 चायना चार्जिंग मोटारसायकल, व ऑईल डबा आदि चोरीचा ऐवज जप्त केला. या आरोपीस धारूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रथम दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर आज पुन्हा त्या आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दादा पवार यास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे तेलगाव चोरी प्रकरणातील एका आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तर याच चोरी प्रकरणातील अन्य एक आरोपी रामज्या कल्याण शिंदे हा अद्यापही फरार असुन, दिंद्रुड पोलीस त्याचा तपास करत आहेत. लवकरच या फरारी आरोपीला अटक करू. असे दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी सांगितले. हे दोन्ही आरोपी कळंब येथील असल्याचे पोलीसांनी सांगितले. याप्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, माजलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ढीसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुडचे सपोनि अनिल गव्हाणकर, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक व्ही. एस.शिंदे व पोलीस कर्मचारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *