देवडीच्या दामिनी देशमुखची ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड

ई पेपर
Spread the love

मराठवाड्यातील पहिली महिला पायलट

– देशमुख परिवाराच्या शिरपेचात
आणखी एक मानाचा तुरा

– मराठवाड्यातील पहिलीच महिला पायलट

 

पुणे – पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांची कन्या दामिनी देशमुख हिची वायुदलातील ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदासाठी निवड झाली आहे.या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येत तीने देदीप्यमान यश संपादन केले आहे.तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
फ्लाईंग ऑफिसर पदासाठी ‘कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट’ घेतली जाते.देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात.त्यापैकी दीड-ते दोन हजार विद्यार्थी यशस्वी होतात.त्यानतर समुह चर्चा,नेतृत्व गुण,परिस्थिती हाताळणे,मैदानी खेळ,अशी व्यक्तीमत चाचणी घेतली जाते.वैद्यकीय चाचणी देखील घेतली जाते.त्यानंतर ‘एअरफोर्स सलेक्शन बोर्डा’कडून मुलाखत घेतली जाते.आणि त्यातून अंतीम निवड केली जाते.यासर्व अवघड प्रक्रिया पार पाडून दामिनी देशमुख हिने हे यश संपादन केले आहे.या परीक्षेत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत येण्याचे प्रमान तीन ते चार टक्केच असते.
दामिनी देशमुखचे पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत झाले आहे.त्यानंतर तीने बी.ई.मेकॅनिकची पदवी प्रथम ऋेणीत उत्तीर्ण केली आहे.
हैदराबाद येथील एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर ती फ्लाईंग ऑफिसर म्हणून रूजू होणार आहे.जानेवारीच्या पहिल्या आठवडयात हैदराबाद येथील प्रशिक्षणासाठी ती रवाना होणार आहे…
दामिनी देशमुख ही मुळची बीड जिल्हयातील देवडी येथील रहिवाशी आहे.पुण्याचे सहधर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख यांची मुलगी आणि पत्रकार एस.एम.देशमुख यांची दामिनी ही पुतणी आहे.विविध खेळांमध्ये देखील तीने यापुर्वी अनेक मेडल्स मिळविलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *