याच मातीत निपजतात उद्याचे महाराष्ट्र केसरी… ■ देवदहिफळच्या फडात रंगल्या कुस्त्यांच्या तुफान दंगली

ई पेपर बीड

हनुमान बडे । धारुर  व  संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी

सालाबादप्रमाणे याही वर्षी देवदहिफळ यात्रेतील कुस्त्यांच्या फडात पहेलवानांच्या तुफान दंगली पहातांना कुस्ती शोकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. चिमुकल्या पहेलवानांसह नामवंत मल्लानी आपले कसब दाखविले. चिमुकल्या पहेलवानांचे खेळ पाहून याच मातीत उद्याचे महाराष्ट्र केसरी निपजत असल्याची भावना निर्माण झाली.
धारुर तालुक्यातील देवदहिफळ येथील यात्रेत खरी पर्वणी असते ती कुस्ती शौकीन मंडळींची. भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे व महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फडास सुरुवात करण्यात आली. आमदार प्रकाशदादा सोळंके, छत्रपती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मोहनराव जगताप, बाबरी मुंडे, बंडू खांडेकर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. गावकऱ्यांच्या वतीने पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
10 रूपयांपासून ते 5000 रुपयांची लाखो रुपयांची बक्षिसे पहेलवांना दिले जातात. श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या विवाहानंतर यात्रा सुरु होते. या यात्रेचे मुख्य आकर्षण येथे संपन्न होणाऱ्या कुस्ती स्पर्धा आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन नामवंत मल्लांनी आपले कसब दाखविण्यासाठी फडात हजेरी लावली होती. जवळपास ५०० पहेलवांनानी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविल्याचे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.
दिंद्रुड पोलीस स्टेशन ते सपोनि अनिल गव्हाणकर दिवसभर फडात ठाण मांडून होते. पोलिसांनी योग्य बंदोबस्त लावल्याने कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. दहा ते पंधरा कुस्ती शौकिनांनी कुस्तीचे मैदान दणाणून सोडले होते.
सदरील कुस्त्यांचा फड यशस्वी करण्यासाठी माजी जि.प.सदस्य विलासराव बडे, सरपंच श्रीधर बडे, नरहरी बडे, श्रीहरी बडे, शिवाजीराव बडे, राज बडे, शिवराज शेप, रामराव बडे, उपसरपंच बाबुराव बडे, दिलीप बडे, दामोधर बडे, मुरलीधर बडे, राजेभाऊ केकान, गोपाळराव बडे, बबन कांदे, अंगदराव राख, बाळू तोडे, नितीन वड्डे, आदींसह सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *