सिडको एन १ परिसरात बिबट्याचा मॉर्निंग वॉक ; नागरिकांची धावाधाव

औरंगाबाद देश-विदेश

औरंगाबाद/ म.सा ऑनलाईन
मॉर्निंग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सिडको एन १ परिसरातील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागील उद्यानात आज सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या दिल्याने सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी बिबट्या दिसताच पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्याना याची माहिती दिली. तात्काळ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरु केली आहे. औरंगाबाद शहरात पहिल्यादाच उच्भ्रू वसाहतीत बिबट्या शिरल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गजबजलेल्या शहरांमध्ये जंगलातून प्राण्यांचा वावर गेल्या काही वर्षात वाढला आहे. ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना पाहायला मिळतात. मात्र, औरंगाबाद शहरात सिडको एन १ परिसरात असलेल्या उद्यानात स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. तात्काळ वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस व वन विभागाचे कर्मचारी परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत. शहरात बिबट्या आढळल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. या भागातील नगरसेवक राजू शिंदे यांच्यासह अनेकांनी उद्यानाकडे धाव घेतली. काळा गणपती मागे असलेल्या उद्यानात हा बिबट्या दिसल्याचे प्रत्यक्ष दर्शिनी सांगितल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोध मोहीम सुरु केली आहे. उद्यानात पिंजरा लावण्यात आला आहे. दरम्यान, सकाळी एन ६ मध्ये हा बिबट्या दिसल्याचे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे शहरात सगळीकडे उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्याला बेशुद्ध करणे आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी वन विभागाकडे इंजेक्शनच नसल्याने या बिबट्याला नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिसता क्षणीच मारण्याची शक्यता वन विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *