श्री खंडोबा यात्रा निमित्ताने भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ई पेपर

 

 

संतोष स्वामी। दिंद्रुड प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र देवदहिफळ येथील श्री खंडोबा यात्रे निमित्त भव्य नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथील शेप परिवार व आनंद ऋषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

 

अधिक वृत्त असे की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दैवत म्हणून सुपरिचित असलेले श्री खंडोबा देवस्थान हे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात देवदहिफळ येथे स्थित आहे. राज्यभरातून लाखो भाविक भक्त चंपाषष्टी ते संक्रांत सणा दरम्यान श्री खंडोबा देवस्थानास भेट देत असतात, लाखोंच्या संख्येने जमा होत असलेल्या भाविकांसाठी श्रीक्षेत्र देवदहिफळ आराद्य दैवत मानले जाते. आज सोमवार रोजी श्री खंडोबाचे लग्न सोहळा हा औत्सुक्याचा विषय भाविकांमध्ये असतो आज हजारोंच्या संख्येने देवदहिफळ व परिसरातील भाविक भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी देवदहिफळ येथे श्री खंडोबाच्या लग्नास उपस्थित होतात यानिमित्ताने येथिल रामेश्वर शेप, लहू बडे,परमेश्वर शेप, परमेश्वर डांगे, अर्जुन बडे, तुकाराम राख, विकास बडे,रघुनाथ बडे,केशव राख, गोकुळ घुगे,किर्तीकुमार जगताप सह ग्रामस्थांच्या नियोजना खाली अहमदनगर येथील नेत्र तपासणी करणारी टीम देवदहिफळ येथे नेत्र तपासणी करणार आहे. डोळ्याचा आजार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासेल अशांसाठी अल्पदरात अहमदनगर येथे नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार असून देवदहिफळ ग्रामस्थांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन देवदहिफळ व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *