पतीने केली पत्नीची क्रुर हत्त्या सिरसाळा येथील घटना

ई पेपर
Spread the love

 

सिरसाळा प्रतिनिधी/
डोळा फोडून, ओठ तोडून, गळा दाबून पत्नी ची क्रुर हत्त्या केल्याची घटना सिरसाळा येथेे सोमवारी दुपारी घडली आहे. येथील अनुसया पेट्रोल पंप च्या मागच्या वस्ती हा प्रकार घडला आहे.

अधिक माहिती अशी की, सिरसाळा येथील नेहा सिराज पठान वय( २६ दरम्यान )या महिलेची पतीने निघृन हत्या सोमवारी दुपारी केल्याची माहिती समोर आली आहे. सिराज अय्युब पठान हा मयत महिलेचा पती आहे. समजलेल्या माहिती नुसार पती सिराज पठान शेती, विट मजूरी चा करतो, आज सोमवारी दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता च्या दरम्यान कामावरुन सिराज घरी आला व पत्नी नेहाला मारहान करण्यास सुरुवात केली. मारहान करत पत्नी नेहाचा एक ओठ तोडला, डावा डोळा फोडला, व कशाने तरी गळा आवळून जिवे मारले असल्याचे समजते आहे. तदनंतर हा प्रकार आत्महत्या असल्याचा बनाव पती करत होता परंतु सिरसाळा पोलिसांनी खाक्या दाखवताच खुन केल्याचे कबुल केल्याचे समजते आहे. हा प्रकार ५ :३० दरम्यान उघडकीस आला.
पोलिसांनी पती सिराज, दोन दिर, व सासु यांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी आक्रोश केला होता. यामुळे तणाव ग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.प्रेतास शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *