रेडीओ स्फोट प्रकरणातील फरार आरोपी चार वर्षानंतर धारूर पोलीसांनी केले अटक

ई पेपर
Spread the love

 

प्रतिनिधी I धारूर

रेडीओमध्ये स्फोटक साहीत्य बनवून मित्रास गोवण्याच्या हेतूने केलेल्या कारस्थानात एस.टी. च्या कंडाक्टरच्या घरी स्फोट होवून हात निकामी झाल्याची घटना सात वर्षापूर्वी केज तालुक्यातील कोळेगाव येथे घडली होती. या प्रकरणात जन्मठेपेची सजा भोगत असतांना सुट्टीवर गेल्यानंतर फरार झालेल्या केंद्रेवाडी येथील बाबा उर्फ मुंजाबा गिरी यास पोलीसांनी चार वर्षानंतर पूणे येथे रविवारी रात्री अटक केले .डोक्यावरील केस वाढवून शिख समाजातील रितीप्रमाणे फिरत होता.

केंद्रेवाडी येथील बाबा उर्फ मुंजाबा गिरी यांचे गावातील एका मित्राबरोबर बिनसले होते . त्याला संपवीण्यासाठी त्याने रेडीओमध्ये स्फोटक साहीत्य ठेवले होते . रेडीओ सुरु करताच त्याचा स्फोट होणार होता . बनविलेला रेडीओ त्याने मित्राच्या घरी जावा असे पार्सल बनविले होते . सदरील पार्सल हे केंद्रेवाडी येथे जाण्याऐवजी एस.टी. कंडाक्टरने घरी काळेगाव येथे नेले होते .पार्सल फोडले असता त्यात रेडीओ निघाला होता . रेडीओ सुरु करताच स्फोट होवून कंडॉक्टरसह कुटूंबीय जखमी झाले होते .सन २०१२ मध्ये हा प्रकार घडला होता . हा प्रकार उघडकीस आल्यास गिरी यांचे नाव समोर आले होते . त्यास या प्रकरणात जन्मठेप झाली होती . तो तुरूंगात होता ,परंतु सन २०१५ मध्ये रजेवर गेल्यानंतर तो फरार झाला होता . या प्रकरणात तुरूंग अधिकारी यांनी तेव्हाच धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता . तेव्हापासून तो पोलीसांना सापडत नव्हता . पुणे येथे एका कंपणीत काम करित असल्याची माहीती मिळाल्यावर व जन्मठेपेतील आरोपी असल्याचा सुगावा लागल्याने पुणे पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले होते . चार वर्षानंतर त्यास अटक केले आहे . चौकशीत तो धारूर पोलीस ठाणे येथील गुन्हयातील आरोपी असल्याचे समजताच त्याची माहिती पोलीसांना देण्यात आली . धारूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर .बी. बनकर, श्री . राठोड, श्री . माळेकर यांनी रविवारी मध्यरात्री त्यास पुणे येथे जाऊन ताब्यात घेतले . त्यास सकाळी धारूर येथे आणण्यात आले होते .  दुपारी त्यास धारूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने औरंगाबाद येथील तुरूंगात हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *