∆ व्हरकटवाडीत झगमगाट ∆डोंगरकुशीतला अंधार ललितांनी दुर केला

ई पेपर बीड
Spread the love

 

संतोष स्वामी । दिंद्रुड

धारुर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरकुशीत विसावलेले व्हरकटवाडी गावातील प्रत्येक विजेच्या खांबावर पथदिवे बसवल्यामुळे व्हरकटवाडीत झगमगाट झाला आहे.

अधिक वृत्त असे की धारुर तालुक्यातील बालाघाटच्या डोंगरकुशीत जवळपास ७०० जनसंख्या असलेली छाेटीशी वस्ती पन्नास वर्षांपासून विसावलेली आहे.डोंगरकपारीतल्या या गावाने पाणी फाऊंडेशन च्या स्पर्धेच्या माध्यमातून गावाला नावलौकिक मिळवून दिला आहे. येथिल सरपंंच ललिता रामकिसन व्हरकटे या गावाच्या सार्वभौम विकासासाठी विविध प्रकारे निधी गावाच्या विकासासाठी खेचुन गाव विकसनशील बनवत आहेेत, दिडशे परििवार संख्या असलेल्या यागावात शनिवारी गावातील खांब्यावर पथदिवे बसवण्यात आले. हे पथदिवे ग्रामपंचायतीच्या१४ वा वित्त आयोगातून गावात ओरिएंट कंपनी चे ३० वॕट असणारे तसेच वीज बचत करणारे पथदिवे गावातील प्रत्येक पोलवर बसवण्यात आले. हे पथदिवे बसवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच ललिता रामकिसन व्हरकटे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी इंद्रराज व्हरकटे, तातेराव व्हरकटे, बाजीराव व्हरकटे, मोहन कारभारी व्हरकटे, सुधाकर लिंबाजी व्हरकटे सह गावातील तरुण मंडळींनी पथदिवे बसवण्यासाठी स्वतःहून मदत केली. गावातील सर्व ठिकाणी पथदिवे बसवण्यात आले असुन अंधारातुन प्रकाशाकडे गावाची वाटचाल कौतुकास्पद असल्याने ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *