परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाने केली पहाणी तेलगांव च्या तोष्णीवाल ची दहा हेक्टर पिकाचे ८१ टक्के नुकसान

ई पेपर
Spread the love

संतोष स्वामी। दिंद्रुड

 

धारुर तालुक्यातील तेलगांव येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे केंद्रीय पथकाने शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. येथिल तोष्णीवाल यांच्या अवकाळी पावसाने सोयाबीन, कापुस व बाजरी चे झालेल्या नुकसानीचा पंचनामा सदर पथकाने केला.

 

अधिक वृत्त असे की,दुष्काळामुळे होरपळलेल्या बळीराजाला परतीच्या पावसाचे दुष्परिणाम भोगावे लागले,हाता तोंडाशी आलेली पिके अतिवृष्टीमुळे नाश पावली, तेलगांव येथे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे केंद्रीय पथकाने शनिवारी प्रत्यक्ष पाहणी केली. येथिल तोष्णीवाल यांच्या अवकाळी पावसाने सोयाबीन, कापुस व बाजरी चे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करत यापथकाने शेतकर्यांना धिर दिला.

पी अँण्ड पी नवी दिल्लीचे सह सचिव

डॉ.व्ही.थिरुपुगाह यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. के.मनोहरन, बीड जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी शेतकरी प्रेमलता उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या सोयाबीन व कापुस पिकाची झालेल्या वाताहतीची पाहणी केली.

 

तोष्णीवाल यांच्या दहा एकर बागेचे पूर्ण नुकसान झाले.८१टक्के हातात आलेली पिके सडली त्याची माहिती तोष्णीवाल यांनी या पथकाला दिली यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर, तहसीलदार व्ही डी शिडोळकर, तालुका कृषी अधिकारी डि एम पाटील, गटविकास अधिकारी सोपान अकेले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *