देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी

देश-विदेश राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी

मुंबईः मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य खरे करून दाखविले. आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्याच्या विधानसभेत २८८ जागा असून फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करू असेही ते म्हणाले. तर २४ तारखेपासून कोणीही सरकार बनवू शकलं नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार येत असेल तर रस्ता काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि सरकार स्थापन केलं, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज राजभवनात राज्यपालांनी या दोन्ही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादीतील २२ आमदारांचा पाठींबा असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांना किती आमदारांचा पाठींबा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असल्याचे स्पष्ट केल्याने राज्याच्या राजकारणात आणखी नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *