बेलुरा येथिल म्हैस चोरी प्रकरणी आरोपींना एक वर्षाची शिक्षा व तिन हजार रुपये दंड

ई पेपर
Spread the love

 

दिंद्रुड ( प्रतिनिधी ) माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथिल म्हैस व वगार चोरीची घटना २१ आॅक्टोबर २०१२ रोजी रात्री घडली होती या संदर्भात माजलगाव येथिल जिल्हा सत्र न्यायालयाने म्हैस चोरी प्रकरणी आरोपींना एक वर्षाची शिक्षा व ३००० / दंडाची कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की , फिर्यादी कल्याण नरसिंग फपाळ रा.बेलुरा ता.माजलगांव यांची म्हैस व वगार दि . २१ आँक्टो २०१२ रोजीच्या रात्री चोरून नेवून दिनांक २६ आँक्टो २०१२ रोजी सकाळी ०९ :०० च्या सुमारास घोडेगांव जनावराच्या बाजारात विक्री करत असताना मिळुन आल्याने दिंद्रुड पोलिस स्टेशनला गु. र. नं ११९ / २०१२ कलम ३७९ भादवि नुसार आरोपीविरूध्द गुन्हा नोंद झाला व त्याच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी माजलगांव न्यायालयाने दोषरोपपत्र दाखल होवून मा . प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी यांनी आरोपीस दोषी धरून दि १८ आँगस्ट २०१५ रोजी एक वर्षाची शिक्षा व ३हजार – रू . दंड अशी शिक्षा ठोठावली होती . दि . १८ अाॅगस्ट २०१५ रोजी दिलेला निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात कि.अ. क.४२ / २०१५ या प्रकरणात मे . न्यायाधीश श्री.अरविंद एस.वाघमारे साहेब यांनी आरोपीचे आपील फेटाळुन आरोपीस शिक्षा कायम ठेवली.सदर अपीलात सरकार तर्फे वरीष्ठ अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री.अजय एस.तांदळे यांनी कामकाज पाहीले व त्यांना सदर प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील श्री.रणजित ए.वाघमारे यांनी सहकार्य केले . प्रथम वर्ग न्यायालयात सरकारी अभियोक्ता श्री.बी.एम. सानप यांनी या प्रकरणात साक्षीदार तपासुन कामकाज केलेले होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *