संतोष स्वामी। दिंद्रुड
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे महसुली गाव दिंद्रुड हे सध्या येथे विविध दर्शनीय जाग्यावर लावलेले बॅनर्स एका चर्चेचा विषय बनले आहे येथील संभाजी चौक ते बस स्टँड दरम्यान ४७५ मिटर सिमेंट रस्ता होणार असून ९३ लाख रुपये खर्चाच्या कामाच्या अंदाजपत्रकाचे चक्क बॅनर गावाच्या दर्शनीय भागावर लावल्याने हे चर्चेचा व कौतुकाचा विषय बनले आहे.
करण्यात येणारे काम पारदर्शक असावे व दर्जेदार व्हावे हा या मागचा उद्देश आसल्याचे बोलले जात आहे.
अधिक वृत्त असे की दिंद्रुड येथील सैलानी बाबा देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळालेला आहे दरवर्षी सैलानी बाबा चा उरूस मोठ्या दिमाखाने दिंद्रुड मध्ये साजरा करण्यात येतो उरुसानिमित्त सैलानी बाबांची वाजत गाजत उंटावरून संदल मिरवणूक निघते. ज्या रस्त्याने हजारो भाविक मिरवणुकीने ज्या मार्गावरुन जातात तो रस्ता सुशोभित असावा या हेतूने अर्धा किमी सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता होणार आहे. हा रस्ता दर्जेदार होण्यासाठी व या कामाचा दर्जा कायम राहावा या उद्देशाने दिंद्रुड मध्ये दोन ते तीन जाग्यावर बॅनर लावण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी सदर निधी गावाच्या विकासासाठी आणलेला असून फडणवीस यांच्या पारदर्शक कामाची ख्याती डोळ्यासमोर ठेवत या रस्त्याची कामे दर्जेदार व्हावी या उद्देशाने व गावकऱ्यांनी होणारे काम लक्षपूर्वक चांगल्या प्रतीचे होत आहे की नाही हे पाहण्यासाठी ही बॅनर्स लावल्याचे सांगितले जात आहे.
कामाच्या पारदर्शकते साठी लावली बॅनर्स- ओमप्रकाश शेटे
“जवळपास अर्धा किमी होणाऱ्या रस्त्याचे माप व होणारे काम हे दर्जेदार असावे या उद्देशाने मुरमाचा स्तर, डबर, बेड सोलींग व कॉंक्रिटचा स्तर हा किती असावा याचा या फलका मध्ये उल्लेख करून तो दर्शनीय भागावर लावण्याचे कारण म्हणजे गावकऱ्यांनी होणारे काम चोख पद्धतीने करून घ्यावेत व कामाचा दर्जा टिकून राहावा हाच यामागे मुख्य उद्देश आहे.” ओमप्रकाश शेटे