नियमित मनपा आयुक्तांच्या मागणीला मंत्रालयातील सचिवांकडून ‘नो रिस्पॉन्स’

देश-विदेश

तीन दिवसांपासून महापौर फोन लावून परेशान

औरंगाबाद / प्रतिनिधी
वारंवार सुट्टीवर जाणाऱ्या मनपा आयुक्त निपुण विनायक दिवाळीपासून गायब आहेत. पालिकेचा कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे नियमित आयुक्त देण्याच्या मागणीसाठी महापौर नंदकुमार घोडेले हे तीन दिवसांपासून मंत्रालयातील मुख्य सचिव अजोय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना फोन करत आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांत त्यांनी महापौरांचा फोन घेतला नाही. त्यामुळे पालिकेचा कारभार ठप्प पडलेला असताना राज्य मंत्रालयातील सचिवांना औरंगाबाद शहराचे वावडे आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून महापालिकेचा कारभार आयुक्तांविना सुरू आहे. नियमित आयुक्त डॉ. निपुण यांनी सुटी वाढवून घेतल्यानंतर प्रभारी आयुक्त असलेल्या जिल्हाधिकार्‍यांनीही आपल्याला आदेश प्राप्त नसल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाला आहे. त्यामुळे पालिकेचा आयुक्त कोण? असा प्रश्न महापौरांनाही पडला आहे. एकतर पालिका निवडणुक तोंडावर आली आहे. त्यामुळे प्रलंबित विकासकामांच्या संचिका आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी पालिका पदाधिकार्‍यांबरोबरच नगरसेवक चिंतेत आहेत. आशा परिस्थितीत आयुक्त डॉ. निपुण यांनी रजा घेऊन पालिकेला वाऱ्यावर सोडले आहे. परिणामी प्रशासकीय प्रमुखच गायब असल्याने अधिकारीही निर्धास्त झाले आहेत. त्यामुळे डॉ. निपुण यांची महापालिकेत पुन्हा येण्याची इच्चा नसेल तर त्यांच्या जागी दुसरा नियमित आयुक्त पाठवावा, अशी मागणी महापौर घोडेले यांनी राज्यपालांकडे केली आहे. यासाठी महापौर घोडेले राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्याशी तीन दिवसांपासून भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत आहेत. मात्र, एकदाही या दोन्ही अधिकार्‍यांनी महापौरांना प्रतिसाद दिलेला नाही. शुक्रवारी दि.15 तिसर्‍या दिवशी दुपारी पुन्हा एकदा महापौरांनी या दोन्ही वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला. मात्र महापौरांची पुन्हा निराशा झाली. यामुळे मंत्रालयातील सचिवांना औरंगाबाद शहराचे वावडे आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *