देंवेंद्रांसाठी देवदुतांची सपत्नीक पदयात्रा काढत कपिलाधार येथील मन्मथ स्वामींना याचना मुख्यमंत्री फडणवीसच व्हावे यासाठी मन्मथ स्वामींना घातले साकडे -ओमप्रकाश शेटे

ई पेपर बीड
Spread the love

संतोष स्वामी। दिंद्रुड

सद्या मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात रस्सीखेच होतांना पहायला मिळत आहे,यातच मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी १०० किमीची चक्क पायी पदयात्रा काढत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी परत महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी यावे याकरिता श्रीक्षेत्र कपिलाधार येथिल मन्मथ स्वामींना साकडे घातले आहेत. लोकप्रतिनिधी साठी प्रशासकाने उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री काळात देवेंद्र फडणवीस यांनी केलेली रुग्ण सेवा सर्वश्रुत आहे. दिन रात्र गरजु रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा हा आग्रह गेल्या पाच वर्षांत बावीस लक्ष रुग्णांवर पंधाराशे कोटी खर्च करणारे देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे हे कपिलधार या पायी दिंडी सोहळ्यात दिंद्रुड ते कपिलाधार सपत्नीक सहभागी झाले. राज्यातील गोरगरीब जनतेचे हक्काचे आशास्थान म्हणून पाहिल्या जाणार्या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परत मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी संत शिरोमणी मन्मथस्वामी यांच्या चरणी साकडे घालण्यासाठी आपण चालत जात असल्याचे ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *