रमजान चा राम तर दिवालीचा अली हे स्नेहाचे नाते दुखवण्यापेक्षा जवळ करुयात -सपोनि गव्हाणकर राममंदिर व बाबरी मशीद निकालाच्या अनुषंगाने दिंद्रुडला सुरक्षा व्यवस्था सक्रिय

ई पेपर बीड

 

संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी

रमजान चा राम तर दिवालीचा अली हे स्नेहाचे नाते दुखवण्यापेक्षा आपुलकीने जवळ करण्याचे आवाहन दिंद्रुड पोलिस स्टेशन चे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी नित्रुड येथिल आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.
आयोद्या येथील राम मंदिर व बाबरी मशिद चा २७ वर्षापासुनचा प्रलंबित निकाल येत्या आठ दिवसात लागण्याची दाट शक्यता असून देशभरात सुरक्षा व्यवस्था सक्रिय झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड येथे सर्व पोलिस दलाची बैठक सोमवारी संपन्न झाली. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गत गावागावात शांतता समिती च्या बैठकीचे आयोजन करण्यात येत असून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस स्टेशन हद्दीतील नित्रुड येथे मंगळवारी सकाळी शांतता समिती ची बैठक संपन्न झाली.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये रामजन्मभूमी व बाबरी मज्जिद या संवेदनशील विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालय यांचेकडून पुढील काही दिवसात निकाल अपेक्षित आहे. हा निकाल देणारी यंत्रणा म्हणजे देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था आहे. त्याच्यावर सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे.तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा सर्व भारतीय नागरिकाने पाळणे बंधनकारक आहे. सदर चा निकाल काहीही असो या निकालानंतर चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया व्हाट्सअप,फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया,पत्रकबाजी टीकाटिपणी देणे हा न्यायालयाचा अवमान ठरेल अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणे म्हणजे हा न्यायालयाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सपोनि अनिल गव्हाणकर यांनी दिली. बैठकीस नित्रुड व परिसरातील सर्व जातीधर्मातील प्रतिष्ठित नागरीक, मौलवी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *