विम्या कंपन्याकडुन शेतक-यांसाठी आडमुठी भुमिका – 72 तासांएैवजी किमान पंधरा दिवसांचा वेळ द्यावा – रमेशराव आडसकर

ई पेपर
Spread the love

 

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे फोटो व विमा भरलेली पावती ही विमा कंपनीच्या मेलवर पाठवायची मुदत कंपनीने फक्त 72 तास ठेवलेली असुन ती मुदत पंधरा दिवसांची करावी अशी मागणी भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे.
अगोदरच दुष्काळाने मारलेल्या शेतक-यांना परतीच्या पावसाने उद्वस्त केल्यानंतर शेतक-यांच्या शेतातील पिकांचे पुरावे द्या म्हणत विमा कंपन्या विम्याच्या पावतीसह सातबारा आणि एक अर्ज 72 तासात शेतक-यांकडून मागवून घेत आहेत. मात्र आॅनलाईन सातबारा अपडेट नसल्याने शेतक-यांच्या शेतातील पिकात आणि आॅनलाईन सातबारारत्र पिकांमध्ये मोठी तफावत येण्याची शक्यता असून कृषी विभागाला कुठला सातबारा द्यायचा याच्या स्पष्ट सुचना आल्या नसल्याने शेतकरी गोंधळलेल्या स्थितीत आहे तर तलाठी शेतक-यांच्या या गोंधळलेल्या परिस्थितीची मजात घेत आहे तर विमा कंपन्या पुन्हा शेतक-यांचा घात करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 72 तासांएैवजी किमान पंधरा दिवसांचा वेळ वाढवुन द्यावा अशी मागणी भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *