माहेश्वरी मित्र परिवार तर्फे घाटी रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना दीपावलीच्या दिवशी फराळ वाटप

देश-विदेश
Spread the love

औरंगाबाद/प्रतिनिधी
मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून उपचारासाठी अनेकजण घाटी रुग्णालयात येत असतात. देशभरात सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना. दुसरीकडे उपचार घेत असलेल्या रुग्णासोबत नातेवाईकांची दिवाळी ही रुग्णालयातच जाते. त्यामुळे त्यांच्या दुःखाच्या, अडचणीच्या काळात काही वेळ का असेना दुःख विसरून दिवाळीचा सण साजरा करावा याच उदात्त हेतूने गेल्या 7 वर्षांपासुन शहरातील माहेश्वरी मित्र परिवारच्यावतीने दीवाळीच्या दिवशी घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ताज्या फराळाचे वा600टप केले जाते आहे.

दिवाळी सण मोठ्या आनंदात सगळीकडे साजरा केला जात असताना दुसरीकडे समाजातील आपले काही बांधव हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतात. दिवाळीत आकाशात उडणारे रंगबिरंगी फटाके, सगळीकडे रोषणाई, फराळाचे पदार्थ, मिठाई यापासून त्याच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनाही मुकावे लागते. त्यांना दिवाळीच्या सणाचा आनंद घेता येत नाही. कुठेना कुठे याची खंत मनात राहतेच. याची उणीव त्यांना जाणवू नये याचीच जाणीव ठेवत माहेश्वरी मित्र परिवाराच्यावतीने गेल्या 7 वर्षांपासून घरी बनवलेला ताज्या फराळाचे वाटप रुग्णांच्या नातेवाईकांना केले जाते. यावर्षी सुद्धा सुमारे 800 नातेवाईकांना फराळ भेट देण्यात आली. विशेष म्हणजे आपल्या मुलांना लहानपणापासुनच गरजुंना मदत करण्याचे संस्कार मिळावेत यासाठी मित्रपरीवारातील लहान मुलांच्या हस्ते फराळ वाटला गेला. या उपक्रमासाठी संतोष तोतला, राजेश मानधनी, मनीश सिकची, नितिन तोष्णीवाल, रविंद्र मालाणी, कैलाश मालपाणी, प्रशांत मालाणी, शोभाराम आसावा, रीतेश मानधनी, कुणाल साबु, ईश्वर चिचाणी, राहुल बियाणी, ओम तापडीया यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी माहेश्वरी मित्र परिवारातील
सदस्यानी सांगितले की, दीवाळीच्या दिवशी आपल्या आनंदात इतरांना सहभागी करुन घेण्यात खरे समाधान लाभते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *