दिंद्रुडमध्ये भारतीय जनता पार्टीचा बोलबाला! इतर पक्ष मात्र कोमात!!

ई पेपर

दिंद्रुड । संतोष स्वामी

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर यांचाच बोलबाला जनसामान्यात दिसून येत आहे, इतर पक्ष मात्र कोमात गेल्याचे सध्या चित्र दिंद्रुड मध्ये आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तोफ काल शनिवारी सायंकाळी थंडावली असून माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे महसूल गाव व जिल्हा परिषद गट असलेले दिंद्रुड व परिसरात भारतीय जनता पक्षाने जनमानसापर्यंत पोहोचत प्रचार केला. आमदार सुरेश धस, मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेटे, मोहनराव जगताप, सौ अर्चना रमेश आडसकर व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत घराघरात कमळ या चिन्हाचा प्रचार केला इतर पक्षांची मात्र उदासीनता व गटबाजी दिंद्रुड व परिसरात स्पष्टपणे दिसून येत आहे. तर दुसरीकडे करोडो रुपयांचा निधी दिंद्रुड व परिसरासाठी आनल्यामुळे ओमप्रकाश शेटे यांच्यावर या परिसरातील जनता खुश असून शेटे सांगतील तोच मार्ग स्वीकारणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रमेश आडसकर व ओमप्रकाश शेटे यांची मैत्री सर्वश्रुत असून आडसकर यांच्या विजयासाठी शेटे यांनी कॉर्नर बैठका घेतल्या तसेच माजलगाव व दिंद्रुड येथील सभेत आडसकर यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष पक्षाला दिंद्रुड मध्ये हजार च्या पुढे मताधिक्य मिळेल अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.जवळपास साडे पाच हजार मतदान असलेल्या दिंद्रुड कडे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस चे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी पाठ फिरवल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांत असलेल्या दुफळी चा फटका मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ला बसणार अशी चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *