माजलगाव मतदारसंघ लक्की आहे;यंदा एकावर एक आमदार फ्रीपंकजा मुंडेच्या वाराने विरोधक घायाळरमेश आडसकराचां उमेदवारी अर्ज उस्फुर्तपणे जमलेल्या अलोट गर्दीच्या उच्चंकानेविजयावर शिक्कामोर्तब!

ई पेपर बीड
Spread the love

 

ज्योतीराम पांढरपोटे । माजलगाव ( प्रतिनिधी )

मोहन जगतापाची काळजी करू नका मी आहे ना माजलगाव मतदारसंघ फार लक्की आहे यंदा एकावर एक आमदार माजलगावला फ्री मिळणार आहे.असा शब्द देत आज पंकजा मुंडे च्या वारांनी विरोधक अक्षरशः घायाळ झाले. आज महायुती चे माजलगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार रमेश आडसकर यांचा उमेदवारी अर्ज हजारो च्या साक्षीने भरण्यात आला त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ना मुंडे बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर, खासदार प्रितम मुंडे,डॉ प्रकाश आनंदगावकर ,  ओमप्रकाश शेटे, आ.केशवराव आंधळे,किसनराव नाईकनवरे,मोहन जगताप राजभाऊ मुंडे,रमेश पोकळै,सचिन मुळुक, सहाल चाऊस, अशोक होके,बबनराव सोळंके,नितीन नाईकनवरे,अविनाश जावळे,अप्पासाहेब जाधव हनुमान कदम, ज्ञानेश्वर मेंडके,डॉ.अशोक तिडके,आरुण राऊत,शेषेराव फावडे,यशवन्त शेळके,संतोष यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ना मुंडे म्हणाल्या पाच वर्षात रस्त्यांनी बीड जिल्हा नटवला आहे.जातीपातीच राजकारण आम्ही खल्लास केला.सत्ता येणार हे माहीत आहे मग माजलगाव चा आमदार हा सत्तेतील पाहिजे म्हणून रमेश आडसकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केलेया.वेळी भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश आडसकर म्हणाले , मी भाजपाचे काम हे सहा वर्ष प्रामाणिक पणे केले कोणत्याही पदाचा उपभोग घेतला नाही. मी सेवक म्हणुन काम करणार.पाणी उचलुन आनु म्हणानारेंना आता उचलुन नेण्याची वेळ आली आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला.मी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.माझा अर्धा मतदार संघ माजलगाव ला जोडला गेला आहे.माझं गाव नाही म्हणून मी बाहेरचा होत नाही मी या मतदारसंघाशी जोडला गेलेलो आहे.मागील 5 वर्षात विकासाची गंगा आणली आहे ती पुढे ही वाहत रहावी म्हणून मला प्रचंड मतांनी विजयी करा.यावेळी बोलताना मोहन जगताप-कार्यकर्त्यानो बेबनाव होऊ देऊ नको,कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडू नका.आठरा पगड जातीला सोबत घ्या.ताई नि जो विश्वस दिला त्यावर मी विश्वास ठेवला आहे असे सांगत कार्यकर्त्यांना एकमताने काम करण्यासाठी सुचना दिल्या.

पंकजा मुंडेनि विरोधकांना हाबाडा देत सगळे बंड रोखले- खा डाँ. प्रितम मुंडे

यावेळी बोलताना खा प्रीतम मुंडे म्हणाल्या की विरोधक भाजप मध्ये बंड व्हावे म्हणून देव पाण्यात घालून बसले होते मात्र पंकजा ताई नि त्यांना असा हाबाडा दिला की त्यांचे अवसान गळाले आम्ही  रस्त्याचे जाळे निर्माण केले.5वर्षात रेल्वे वेस ओलांडून बीड जिल्ह्यात आली आहे.शेतकऱ्यावर आम्ही कधीच अन्याय होऊ देणार नाही.असे डॉ खा प्रीतम मुंडे म्हणाल्या.

प्रकाश सोळंकेचे नातेवाईक भाजपात

माजलगाव कारखान्याचे संचालक व प्रकाश सोळंके चे जवळचे नातेवाईक शिवाजी रंजवन,कृ उ बा चे उपसभापती नीलकंठ भोसले सह शेकडो युवकांनी आज ना पंकजा मुंडे यांच्या उपस्थित त भाजप मध्ये प्रवेश केला आडसकर यांच्या या हाबड्या ने राष्ट्रवादीचे अवसान गळाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *