रमेश आडसकर, नमिता मुंदडा हे पंकजा मुंडे यांनी स्वत: निवडून येण्यासाठी उभा केलेले प्यादे-बजरंग सोनावणे यांचा घणाघात

ई पेपर बीड

 

 

संतोष स्वामी। मो. 9923980099

जिल्हा परिषद ला निवडुन येण्याची औकात नसतांना माजलगाव मतदार संघातून उमेदवारी दाखल करत बघीतलेले स्वप्न आडसकर करांचे भंगणार आहे. परळीची जागा जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांनी उभा केलेले नमिता मुंदडा व रमेश आडसकर हे दोन प्यादे आहेत. माजलगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाश सोळंके यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी मंगलनाथ मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे, नमिता मुंदडा व रमेश आडसकर, मोहन जगताप यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधानसभा निवडणूकीचे पडघम आता वाजु लागलेत निवडणुक अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असतांना राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन आघाडी, आर. पी. आय.एकतावादी, मानवी हक्क अभियान, पी आर पी कवाडे गट आदि मित्र पक्षाच्या वतीने प्रकाश सोळंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजलगाव मतदार संघातून अभुतपूर्व जनसमुदाय उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *