वेदिका साळुंकेची राज्यस्तरीय स्पर्धेची निवड

ई पेपर बीड

 

बीड (प्रतिनिधी)ः- येथील द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालयातील इयत्ता 7 वीची विद्यार्थीनी वेदिका नेमीराज साळुंके या विद्यार्थीनीची औरंगाबाद येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या विभागीय पोहण्याच्या स्पर्धेत विभागात दुसरी आल्याने नागपूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून या निवडीने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वेदिका साळुंके हिने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळवून विभाग स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी 14 वर्ष वयोगटाखालील विद्यार्थ्यांमध्ये तिची निवड करण्यात आली. सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे विद्यापीठ परिसरात पोहण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये 100 मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिने दुसरा क्रमांक पटकावला. या बरोबरच 200 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत तिचा दुसरा क्रमांक आला. या स्पर्धेनंतर पहिल्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर दि.14 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणार्‍या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक रामलाल छाजेड, प्रा.कैलास लगड, उपमुख्याध्यापक राम चांदणे, पर्यावेक्षक सारडा आदींसह विशाल साळुंके, नेमीराज साळुंके, मुख्याध्यापक सचिन पवार यांच्यासह शिक्षक, शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *