दिंद्रुडचे शेकडो तरुण तुळजापूर कडे रवाना● ओमप्रकाश शेटेंच्या उमेदवारीसाठी तुळजाभवानीला साकडे..!

ई पेपर बीड
Spread the love

दिंद्रुड दि.29 (प्रतिनिधी) :- आज दिंद्रुड येथील शेकडो तरुण तुळजापूरहुन पायी मशालज्योत आणण्यासाठी वाजत गाजत रवाना झाले. गावच्या भूमीपुत्राला भाजपा कडून उमेदवारी मिळावी व प्रचंड मताधिक्यांनी त्यांचा विजय व्हावा यासाठी गावकऱ्यांच्या वतीने तुळजाभवानीला साकडे घालण्यात येणार आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, माजलगाव मतदार संघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू तथा मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी मतदारसंघात संपर्क दौरे सुरू केले आहेत .शेटे यांनी गेल्या साडेचार वर्षात हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. बीड जिल्ह्यात देखील त्यांनी या माध्यमातून आपली वेगळी छाप सोडली आहे .गेल्या दीड दोन वर्षांपासून ते माजलगाव मतदार संघात संपर्कात असून गेल्या महिनाभरापासून त्यांनी वाडी – वस्ती व तांड्यावर देखील लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.
ओमप्रकाश शेटे यांना नवीन व तरुण चेहरा म्हणून मतदार संघात मोठा प्रतिसाद मिळत असून स्थानिकचा उमेदवार हवा असा आग्रह मतदार धरत आहेत. अशा परिस्थितीत शेटे यांच्या नावाची जोरदार चर्चा गावा गावात होतांना दिसून येत आहे. आपल्या गावातील तरुणाला आमदारकीची उमेदवारी मिळणार असल्याने जवळपास 15000 लोकसंख्या असलेल्या दिंद्रुड या शेटे यांच्या जन्मगावी तरुणांनी कुलदैवत तुळजाभवानी मातेला साकडे घातले आहे. आज पंचक्रोशीतील शेकडो तरुण तुळजापूरहुन पायी मशालज्योत आणण्यासाठी वाजत गाजत रवाना झाले. रविवारी सकाळी या मशालज्योतीचे गावात भव्य स्वागत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *