राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गोरख चव्हाण यांचा सत्कार

औरंगाबाद

औरंगाबाद /प्रतिनिधी
पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक गोरख चव्हाण यांना उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीमुळे २०१९ मध्ये पोलीस दलातील सन्मानाचा पुरस्कार राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. गोरख चव्हाण हे सन १९८६ मध्ये विवेकानंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यांचे वर्गमित्रांनी, आपल्या मित्रास राष्ट्रपती परस्कार मिळाला याचा अभिमान बाळगुन व या निमित्ताने पुन्हा ३४ वर्षानंतर जुने सर्व वर्गमित्र एकत्र येवुन भेटतील या उद्येशाने गोरख चव्हाण यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन दि.२२ सप्टेंबर रोजी सायंकाळी जालना रोडवरील हॉटेल नैवैद्य येथे केले होते. यावेळी उद्योजक रवि मसाले समूहाचे रवि जैन, ॲड. बी.आर.जायभाय, एलआयसी अधिकारी रवि वटटमवार, उद्योजक साहेबराव जगताप, व्यापारी वित्तेश मेहता, उदय लडडा, सनिल करवा, विवेक महामुनी, फडके, दिपक खळदे पोलीस खात्यात कार्यरत असलेले गोकळ वाघ, गणेश शिंदे, संजय चोबे आदींची उपस्थिती होती. यावेळी गोरख चव्हाण यांचा सन्मान चिन्ह व विशेष पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला. यावेळी इतर सहकारी ज्यांना या कार्यक्रमासाठी ते बाहेरगावी असल्याने येता आले नाही ते बिल्डर संजय कासलीवाल, ॲड. संजय बोरसे खळदकर, ॲड. नरेश गाडेकर, श्रीमती सुरेखा माग यांनीही चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *