मिताली कुलकर्णी सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यश

खेळ जगत

औरंगाबाद : येथील मिताली अमित कुलकर्णी हिने बंगळुरू येथे झालेल्या सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यश मिळवले.  महाराष्ट्र संघातर्फे १७ वर्षांखालील मुलींमध्ये तिने सहभाग नोंदविला. पादुकोण द्रविड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंगळुरू येथे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान झालेल्या सीआयएससीई राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्र संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. मिताली हिच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मिताली केंब्रिज स्कुलची इयत्ता दहावीची विद्यार्थ्यांनी असून महावितरणचे कार्यकारी अभियंता अमित कुलकर्णी यांची ती कन्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *