किल्लेधारुर / प्रतिनिधी
श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय आडस येथील माध्यमिक शिक्षक तथा किल्ल्लेधारुर येथील किल्लेधारुर युथ क्लबचे सक्रिय सदस्य सुरेश भैरुनाथ शिनगारे यांना विभागीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार, समाज कार्यासाठी रोटरी क्लबचा रोटरी भूषण या पुरस्कारा पाठोपाठ आता अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ संस्था सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी देण्यात आला. या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
किल्ले धारूर शहरातील किल्लेधारूर युथ क्लब या सामाजिक संघटनेत कार्य करणारे समाजसेवक तथा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आडस ता.केज जि.बीड या शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरेश भैरूनाथ शिनगारे यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण कार्य केले. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विभागीय स्तरावरील प्रशिक्षण , विद्यार्थाना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, नवोदय विद्यालयासाठीचे मार्गदर्शन तसेच त्यांचे अनेक विद्यार्थी वैद्यकिय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रा बरोबरच अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहेत. शाळेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमात त्यांचा उल्लेखनिय सहभाग असतो. यामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, स्वच्छता मोहिम, सांस्कृतीक कार्यकमाचे आयोजन तसेच आडस गावातील गणेश मंडळाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. सुरेश शिनगारे यांचा त्यांच्या जन्मगावी सुध्दा अनेक सामाजिक कार्यक्रमात महत्त्वाचा सहभाग असतो. किल्लेधारूर युथ क्लब नी किल्लेधारूर शहरात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. यामध्ये चार तलावाचे व विहिरी बारवाचे खोलीकरण व गाळ उपसा. किल्लेधारूर शहरात स्वच्छता अभियान मोहिम , किल्लेधारूर शहराचे वैभव असलेला महादूर्ग किल्ला स्वच्छ करण्यासाठी युथ क्लब ने महास्वच्छता अभियान राबविले. यामध्ये मराठवाडयाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पाच हजार श्रमकरी आणि समाजसेवकांनी भाग घेतला. तसेच हुतात्मा स्मारक येथे अनेक समाजसुधारकांच्या जयंती साजरी करणे, जागतिक माहिला दिनानिमित्त अनेक कर्तबगार महिलांचा सत्कार, शिक्षक दिनी अनेक शिक्षकांचा सत्कार, स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या युवकांचा सत्कार आणि त्यांचे मार्गदर्शन, एक गाव एक गणपती या उपक्रमाअंतर्गत किल्लेधारूर तालुक्यातील अनेक गावातील गणेश मंडळाचा सत्कार. या आणि अशा अनेक सामाजिक उपक्रमात सुरेश शिनगारे सर यांचा उत्साहपूर्ण सहभाग असतो. रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे याची जाणिव ठेवून त्यांनी अडोतीस वेळा रक्तदान केले.
संपूर्ण महाराष्ट्रातला दुष्काळ संपविण्यासाठी पाणी फाऊंडेशन यांनी राबविलेल्या वॉटर कप स्पर्धत उल्लेखनीय सहभाग नोंदविला. यामध्ये दर वर्षी राबवण्यात आलेल्या पंचेचाळीस दिवसांपैकी जवळपास सत्तावीस दिवस किल्लेधारूर तालुक्यातील गावांमध्ये दर दिवशी दोन तास प्रमाणे युथ क्लब सदस्यांसोबत श्रमदान केले. या सर्व आणि इतर अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना दि.७ जूलै २०१९ रोजी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती माध्यमिक विभाग व श्रीवर्धन फाऊंडेशन बीड यांच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार बीड येथे देण्यात आला. यानंतर रोटरी क्लब ऑफ किल्लेधारूर यांच्या वतीने दिला जाणारा रोटरी भूषण हा पुरस्कार ३१ ऑगस्ट या दिवशी किल्लेधारुर येथे देण्यात आला. या सर्व शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ संस्था सोलापूर व लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २२ सप्टेंबर रविवार रोजी देण्यात आला. या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
“शैक्षणिक कार्य करत असताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देता आले पाहिजे. अध्यापन करत असताना शिक्षकाने आनंदाने शिकवले पाहिजे. मुलांच्या समस्या जाणून घेताना त्यामध्ये स्वतः चे मूल पाहता आले पाहिजे. तसेच सामाजिक कार्य करत असताना प्रत्येकांने जमेल तसे थोडे – थोडे का होईना समाज कार्य केले पाहिजे. त्या वेळीच आपला समाज सुधारला जावू शकतो. या पुरस्कारांनी आणखी जबाबदारी वाढली असून येणाऱ्या काळातही शाळेतील आणि किल्लेधारूर युथ क्लब च्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक कार्य करीत राहीन”
श्री.सुरेश भैरूनाथ शिनगारे
आदर्श शिक्षक तथा समाजसेवक,किल्लेधारुर.