कॅन्सर प्रतिबंधक लसीकरणाचा मुलींनी लाभ घ्यावा- सौ.शिल्पा ओमप्रकाश शेटे

ई पेपर बीड

माजलगांव-सिद्धेश्वर विद्यालयात कॅन्सर लसीकरण जागृती पालक मेळावा आज संपन्न झाला.मुली – महिला कॅन्सर लसीकरणची जागृती निर्माण करण्यासाठी येथील श्री सिद्धेश्वर विद्यालयात आज कॅन्सर लसीकरण जागृती पालक मेळावा संपन्न झाला. दि.२८ रोजी तब्बल ५०० मुलींना २५ लाख रूपयांच्या कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे.मेळाव्याची सुरुवात माता सरस्वती, महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाले.
या पालक मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून प्रेमकिशोर मानधने तर प्रमुख मार्गदर्शक राजेश सोनार, प्रमुख उपस्थितीत सौ शिल्पा ओमप्रकाश शेटे, शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजेश सोनार यांनी उपस्थित विद्यार्थ्यीनी, महिला पालकांना त्यांचे विविध आजार तसेच कॅन्सर या आजाराचे वाढते प्रमाण व त्याची कारणे तसेच लसीकरणाचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर सौ शिल्पा शेटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या पालक मेळाव्याचे अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांनी केले, प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय कुलकर्णी, आभार व सुत्रसंचालन श्रीमती प्रज्ञा देशपांडे यांनी केले. या पालक मेळाव्यासाठी इयत्ता ७ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थीनी, माता- पिता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *