सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात शिक्षण, आरोग्य आणि संस्काराची रुजवण केली जाते – ओमप्रकाश शेटे

ई पेपर बीड
Spread the love

माजलगाव ( प्रतिनिधी ) श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात शुद्धजल पुरवठा प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन, सामान्य,गोरगरीब, कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच संस्काराची रुजवण करणारे हे श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल आहे.त्याचाच एक भाग म्हणून शुद्ध जलप्रकल्प आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा उत्तमराव कांदे(मा जिल्हासंघचालक- बीड जिल्हा (पुर्व), प्रमुख अतिथी ओमप्रकाश शेटे (प्रमुख – मुख्यमंत्री, सहाय्यता कक्ष), नितीन शेटे (कार्यवाह – भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई),
प्रा चंद्रकांत मुळे (सहकार्यवाह – भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई), डॉ हेमंत वैद्य (सहकार्यवाह – भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई),संजयराव देशमुख (विभागीय व्यवस्थापक – बुलढाणा अर्बन बँक),प्रकाश दुगड (अध्यक्ष – श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल), अमरनाथ खुर्पे (कार्यवाह- श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल), गोरख बादाडे (तालुका संघचालक, माजलगाव) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती, सरदार वल्लभभाई पटेल व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन झाले.
यावेळी संस्थेचे सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे यांची औरंगाबाद बोर्ड सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संकुलाच्या वतीने प्रा चंद्रकांत मुळे यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, माझ्या जडणघडणीत, प्रगतीत संस्था,श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, प्राध्यापक यांचा महत्वाचा वाटा आहे.
यानंतर कार्यवाह नितीन शेटे यांनी आपल्या मनोगतातून प्रत्येक चांगल्या उपक्रमाची सुरुवात श्री सिद्धेश्वर शैक्षणिक संकुलात होते, नंतर आपण ते उपक्रम संस्थेत राबवतो. त्यापैकी आज उदघाटन करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी शुद्ध जल प्रकल्प हा स्तुत्य उपक्रम आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा उत्तमराव कांदे यांनी सांगितले की प्रत्येकाने पाणी बचत केली पाहिजे, प्रास्ताविक अमरनाथ खुर्पे, परिचय अंबादास रोकडे, सुत्रसंचालन रतन गिरी ,आभार प्रदर्शन अनंतराम कोपले यांनी केले.
यावेळी नंदकिशोर भुतडा, प्रेमकिशोर मानधने, अॅड विश्वास जोशी, जगदीश साखरे,बिपिन क्षीरसागर, नितीन डोळे,प्राचार्य डॉ भालचंद्र कराड, मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, अंबादास रोकडे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *