धारूर तालुका माहेश्वरी सभेच्या सचिवपदी पञकार बालाप्रसाद जाजु यांची निवड

ई पेपर

तेलगाव, दि (प्रतिनिधी)=
धारूर तालुका माहेश्वरी सभेची नुतन कार्यकरणी शनिवारी सर्वानुमते निवडण्यात आली असुन, यावेळी माहेश्वरी तालुका सभेचे अध्यक्ष म्हणुन धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुलेख कलंत्री यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष म्हणुन जगदीश तोष्णीवाल तर तालुका सचिव म्हणुन पञकार बालाप्रसाद जाजु यांची निवड करण्यात आली आहे. यानिवडीबद्दल नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे विचार प्रत्येक घटकापर्यत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्न करू. अशी ग्वाही अध्यक्ष सुलेख कलंत्री यांनी दिली.
बीड जिल्हा माहेश्वरी सभेच्या विद्यमान पदाधिकारी यांचा तीन वर्षाचा कार्यकाल पुर्ण होत असल्याने नुतन कार्यकरणी निवडण्याच्या दृष्टीने माहेश्वरी सभेचे जिल्हा निवडणुक पदाधिकारी शनिवारी धारूर तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी धारूर येथील तोष्णीवाल यांच्या निवासस्थानी तालुक्यातील सर्व माहेश्वरी समाज बांधवांची बैठक माजी अध्यक्ष गोविदभाऊ तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा निवडणुक पदाधिकारी प्रा.शांतीलालजी लाहोटी, प्रा.भंडारी आदि उपस्थित होते. प्रारंभी समाजाच्या विविध प्रश्नांवर , विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर धारूर तालुका नुतन कार्यकरणी निवडण्याबाबत चर्चा केली असता उपस्थित सर्वांनी माजी अध्यक्ष गोविदभाऊ तोष्णीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्याचा प्रस्ताव ठेऊन, लगेच निवडणुक प्रक्रिया पार पाडण्याची कल्पना मांडली होती. त्यास निवडणुक पदाधिकारी प्रा.लाहोटी व प्रा.भंडारी यांनी संमती दिली. यावेळी तेलगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सुलेख कलंत्री यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवण्यात आले. त्यास उपस्थित सर्वांनी संमती दिली. त्यानंतर उपाध्यक्ष पदासाठी धारूर येथील जगदीश तोष्णीवाल यांचे नाव सुचवले तर सचिव पदासाठी तेलगाव येथील पञकार बालाप्रसाद जाजु यांची निवड करण्यात आली. यावेळी इतर इतर निवडीही सर्वानुमते करण्यात आल्या. यात तालुका कोषाध्यक्ष हरिश तोष्णीवाल, ता.सदस्य अशोक तोष्णीवाल, श्याम तोष्णीवाल तसेच जिल्हा प्रतिनिधी श्रीराम सिकची, प्रविण तोष्णीवाल यांची तर मार्गदर्शक म्हणुन गोविंदभाऊ तोष्णीवाल यांची निवड करण्यात आली.निवडीनंतर सर्व नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नुतन अध्यक्ष कलंत्री आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, धारूर तालुका माहेश्वरी सभेचे सामाजिक कार्यात मोठे योगदान असुन, कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरातील पुरग्रस्तांना गोविदभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी मदत करण्यात आली. यासह इतरही अनेक कार्य केले आहे. हीच सामाजिक कार्याची परंपरा आपण कायम ठेऊन, यापेक्षा इतर अनेक विविध समाज उपयोगी कार्य करू. अशी ग्वाही कलंत्री यांनी दिली. तर प्रा.लाहोटी व प्रा भंडारी यांनी निवडणुक न घेताच पहिल्याच बैठकीत निवड प्रक्रिया पार पाडल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *