पक्षाने आदेश दिल्यास शिवसेनेच्या वतीने माजलगाव विधानसभा लढवणार- आप्पासाहेब जाधव

ई पेपर बीड राजकारण
Spread the love

 

माजलगाव ( प्रतिनिधी ) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आदेश दिला तर माजलगाव विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी आपण तयार असल्याचे आप्पासाहेब जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने व मराठवाडा संपर्क नेते चंद्रकांतजी खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार असल्याचे तालुका प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले.आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मराठवाड्यातील विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेण्यात आल्या. तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव हे माजलगाव विधानसभेसाठी इच्छुक असुन त्यांनीही आज शिवसेना भवनात मुलाखत दिली. आतापर्यंत पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करून पक्षाचे काम केले आहे. पक्षाने कोणतेही जबाबदारी दिल्यास ती स्वीकारण्यास तयार असल्याचे आप्पासाहेब जाधव यांनी सांगितले. तसेच आपण बाळासाहेबांच्या विचारा चा वारसा जपणारे सैनिक आहोत. विधान सभेवर भगवा फडकवणे आणि आदित्य ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जर पक्षाने आदेश दिले तर विधानसभा लढण्यास तयार असल्याचे आप्पासाहेब जाधव यांनी स्पष्ट केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व शिवसैनिक यांच्यावर माझा विश्वास असून मी त्यांच्या या विश्वास व प्रेमावर निवडणूक मी जिंकू शकतो. सामान्य नागरीक व शिवसैनिकांना कोणीही कमी लेखू नये. तेच माझे सर्वस्व आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *