जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने चोपनवाडीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

ई पेपर बीड

 

 

दिंद्रुड दि.10 (प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या चोपनवाडी येथील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना जनसेवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अर्जुनबापू वनवे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बंडू खांडेकर, डॉ. दत्तात्रय भुजबळ, विनोद फड, आसाराम कानडे, मनोहर कटारे, व्यंकटेश करे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद वणवे, सचिव गोविंद वणवे यांनी स्वागत केले.

समाजातील उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी

सेवाभावी संस्था निर्माण आल्या पाहिजेत. तसेच अशा लोकोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थेस गावकऱ्यांनी सहकार्य करुन हातभार लावला तरच आहेर आणि नाहिरे मधील दरी कमी होऊ शकते असा विश्वास डॉ.दत्तात्रय भुजबळ यांनी व्यक्त केला. तर बंडू खांडेकर यांनी मानवी जीवनात गुरु चे असलेले अनन्य साधारण महत्व आपल्या मनोगतात व्यक्त केले

गरजू व सामान्य कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने सुरु झालेल्या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली. यावेळी अशोक वनवे, रणजित वनवे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन गोविंद बडे यांनी तर आभार सोमनाथ वनवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *