महसूल संघटनेचे संपाच्या दिवशी रक्तदान शिबिर

ई पेपर बीड
Spread the love

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने परळी तहसील कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार, कार्यालयीन कर्मचारी व महसूल विभागाच्या सर्वांनी या शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महसूल कर्मचाऱ्यांचे गेल्या दोन दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्यावतीने सर्वत्र रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून परळी तहसील कार्यालयात आज रक्तदान शिबिर घेण्यात आले.
महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दप्तरी प्रलंबित आहेत, यामुळे असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. परळी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आज एक दिवशीय संप पुकारला होता. या पार्श्वभूमीवर सर्वांनी रक्तदान केले. महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. ज्यामध्ये अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला, परंतु ग्रेड पे मात्र वर्ग 3 च्या पदाचा देण्यात आलेला असून तो वाढविण्यात यावा, महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे करावे, नायब तहसीलदार संवर्गातील सरळ सेवा भरती चे प्रमाण 33 टक्‍क्‍यांवरून 20% करावे, अव्वल कारकून वर्ग-3 या संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्‍नती द्यावी, आकृतिबंधात सुधारणा करून दांगट समितीने सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करावीत, यासह अनेक मागण्यांचा आज दिलेल्या निवेदनात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *