पोलीस अधीक्षकांनी दाखवली माणुसकी!

ई पेपर बीड
Spread the love

अपघातग्रस्तस मदत केल्याने वाचले एकाचे प्राण

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे परळी वैजनाथ येथे शांतता बैठकीसाठी येत असताना सिरसाळा नजीक जवळा पाठीवर एक अपघातग्रस्त तरुण रस्त्याच्या बाजूस पडलेला आढळून आला तात्काळ गाडी थांबवत त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या व्यक्तीस आपल्या गाडीत घालून सिरसाळा येथे आणले व त्याच्यावर प्रथमोपचार करून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दाखवलेल्या माणुसकी मुळे आज एका अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचू शकले आहेत. माणिक खंडागळे (वय 50) रा.फकीर जवळा असे अपघातग्रस्त व्यक्तीचे नाव आहे.
वर्दीच्या आतही माणूस दडलेला असतो याचे दर्शन आज सर्वांना घडून आले. सिरसाळा नजीक असलेल्या जवळा पाटी जवळ एका अपघातग्रस्त तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आपली गाडी तात्काळ थांबवली व त्याला आपल्या गाडीत घेऊन सिरसाळा येथे आणून त्याच्यावरती प्रथमोपपचार केले. पुढे परळी वैजनाथ येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता बैठकीस त्यांना जायचे असल्याने सिरसाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.डोंगरे यांच्याकडे जबाबदारी सोपवून ते निघून गेले. पोलीस निरीक्षक डोंगरे पाटील यांनी अपघातग्रस्त माणिक खंडागळे (वय 50) रा.फकीर जवळा यांच्यावर सिरसाळा येथे उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवून दिले आहे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वांना कौतुक वाटत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या माणुसकी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *