उत्सव श्रद्धेचा, पर्यावरण संवर्धनाचा; दैनिक मराठवाडा साथीचा उपक्रम

ई पेपर बीड
Spread the love

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती व गणेश पूजा साहित्य अल्प दरात उपलब्ध


परळी वैजनाथ : दैनिक मराठवाडा साथी गणेशोत्सव 2019 अंतर्गत एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरणाची होत असलेली हानी आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जावा, यासाठी शुद्ध शाडू मातीच्या गणेश मूर्ती अतिशय अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात पुरेल एवढे साहित्य नाममात्र दरात म्हणजेच फक्त 51 रुपयांच्या किमतीत देण्यात येत आहे.

परळीकर नागरिकांनी पर्यावरण संवर्धन निसर्गाची हानी रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करावा यासाठी दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व पर्यावरणाला कुठलीही हानी न होऊ शकणाऱ्या श्रीगणेशाच्या शाडूच्या मूर्ती अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती ज्यांना हव्या असतील त्यांनी मराठवाडा साथी मल्टी सर्विसेस चे कार्यालय औद्योगिक वसाहत कार्यालयाच्या समोर येथे संपर्क करावा. तर 11 प्रकारचे श्री गणेश पूजेचे साहित्यही कृष्णा लाहोटी यांच्या सहकार्याने संपूर्ण उत्सव काळात पुरेल एवढ्या स्वरूपात फक्त 51 रुपयांच्या किंमतीत देण्यात येत आहे. या पूजा साहित्याच्या बॉक्ससाठी राजस्थानी मल्टिस्टेट, मुख्य कार्यालय, हालगे गल्ली व मराठवाडा साथी मल्टी सर्विसेस चे कार्यालय औद्योगिक वसाहत कार्यालयाच्या समोर येथे उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी अनिल जठार (9730305999) यांच्याशी संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

उत्सव काळातील स्पर्धांची लवकरच घोषणा
दैनिक मराठवाडा साथी गणेशोत्सव 2019 अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रशासकीय अधिकारी व राजकीय नेते यांच्या संवाद कार्यक्रमांतर्गत मुलाखती तर संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांची लवकरच दैनिक मराठवाडा साथी च्या माध्यमातून घोषणा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *