जिकडे-तिकडे किड्यांचा उच्छाद!

ई पेपर बीड
Spread the love

नागरिकांना करावा लागतोय नव्या संकटाचा सामना

दत्तात्रय काळे (परळी वैजनाथ)

निसर्गाच्या अवकृपेने आधीच अनेक संकटे उभी असताना आता नव्याच एका संकटाचा नागरिकांना सामना करावा लागतोय. ते संकट म्हणजे जिकडे पहावे तिकडे किड्यांची चर्चा होतेय. हवामानातील असामान्य बदल आणि निसर्गाची नवी उत्पत्ती आहे. अगोदरच पाऊस नसल्याने पिकं करू लागले आहेत, पाण्याची भीषण टंचाई सगळीकडे निर्माण झाली आहे, हवामानातील उष्णता प्रचंड प्रमाणात वाढली असून पावसाळा संपत आला तरी निसर्गाच्या अवकृपेने सर्व तलाव, धरणे, विहिरी आणि बोअर कोरडेठाक पडले आहेत. अशा सगळ्या संकटांचा सामना करता करता आता नवेच एक संकट उभे टाकले आहे.
जिथे जावे तिथे छोट्या छोट्या किड्यांनी उच्छाद मांडलेला दिसून येतोय. घराघरात व चौकाचौकात छोट्या छोट्या थ्रिप्स प्रमाणे भासणार्‍या किड्यांची संख्या प्रचंड प्रमाणात दिसून येतेय. जेवणातील ताटात, अंथरुणात, अंगणात सगळीकडे किडे किडे आढळत असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत. हे नवे संकट काय? आणि त्यावरील उपाय योजना काय? याबाबत मात्र कोणाकडेच काही उत्तर नाही.

तज्ञ काय म्हणतात?
काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे थोड्या थोड्या प्रमाणात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे या किड्यांची पैदास गवतावर झालेली आहे. प्रकाशाकडे आकर्षित होणारे हे किडे सायंकाळच्या वेळी घराघरात जातात. मात्र एखादा मोठा पाऊस झाला तर या किड्यांचे प्रमाण कमी होऊ शकेल असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *