परळीत मालगाडीसमोर येऊन तरूण युवकांची आत्महत्या

ई पेपर बीड
Spread the love

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

परळी रेल्वे स्टेशन येथील रेल्वे पटरी वरून १२.१५ वाजता रेल्वे पटरी वरून मालगाडी रुळावरून जात असताना परभणी जिल्ह्यातील विष्णू सावंत या तरूणाने रेल्वे रुळावर जाणाऱ्या रेल्वे गाडी समोर आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या युवकाचे २५ वर्षीय अंदाजीत वय आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की परळी रेल्वे स्थानकातून मालवाहतूक करणारी रेल्वे परळी येथून बारा वाजता जात असताना या मालगाडी समोर एका तरुण युवकांनी आपले जीवन संपवले आहे याठिकाणी यात असलेल्या नागरिकांनी सांगितले की हा युवक गाडी समोरून येत असताना पळत आला व रेल्वे रुळावर झोपला. या युवकाच्या गळ्यावरून मालगाडीचे गेल्यानेचाक गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला झाला असल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्ती हा विष्णू बालासाहेब सावंत रा.उखळी ता.सोनपेठ, जि.परभणी येथील युवक असल्याची ओळख पटलेली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. या घटनेचा पुढील तपास करून नोंद करण्याची प्रक्रिया बातमी लिहिपर्यंत सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *