अंबादास दानवे विक्रमी ५२४ मताधिक्क्याने विजयी, शहरात शिवसैनिकांचा जल्लोष

औरंगाबाद
Spread the love

अंबादास दानवे विक्रमी ५२४ मताधिक्क्याने विजयी, शहरात शिवसैनिकांचा जल्लोष

औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी ५२४ मते घेत दणदणीत विजय मिळवला आहे. कॉंग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी देऊन विधान परिषदेमध्ये पाठवले आहे. स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी ५२४ मते घेत दणदणीत विजय मिळवला आहे. अखेर अंबादास दानवे आमदार झालेच अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांमध्ये उमटत आहे. स्थानिक स्वराज निवडणुकीत केवळ शिवसेनाच नव्हे तर एम आय एम, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचीही मते दानवे यांनी घेतल्याने कॉंग्रेसचे बाबुराव कुलकर्णी यांना केवळ १०६ मतांवर समाधान मानावे लागले आहे.

शहरात विजयी मिरवणूक

अंबादास दानवे यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होताच गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. मतमोजणी केंद्रापासून शहरात दानवे यांची खुल्या वाहनातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हाप्रमुख जनार्दन द्विवेदी, सभागृह नेता विकास जैन, माजी स्थायी समिती सभापती रेणुकादास वैद्य, नगरसेवक मनोज गांगवे, मकरंद कुलकर्णी, राजू दानवे, प्रशांत देसरडा, सीए रोहन अचलिया यांच्यासह सेना-भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शेकडो दुचाकी व चारचाकी वाहनांसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गुरुवारी (दि.२२) सकाळी आठ वाजता चिकलठाणा फूल्ट्रॉन कंपनीत मतमोजणीला सुरुवात झाली. शिवसेना-भाजपा युतीचे अंबादास दानवे यांना पहिल्या फेरीत ५२४ मते मिळाली. तर कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांना १०६ मते मिळाली. पाचही फेरीत दानवे आघाडीवर होते. अपक्ष शहानवाज खान यांना ३ मतांवर समाधान मानावे लागले. युतीकडे ३३० मते होती दानवेंना यापैकी १०७ मते जास्त अधिकची मिळाली आहेत. अपक्ष आणि एमआयएमची मते अंबादास दानवे यांना पडली आहेत. आघाडीकडे २५० मते होती तरी कुलकर्णी यांना यापैकी १०६ मते मिळाली आहे. यावरून कॉंग्रेसने निवडणुकीअगोदरच मताचे गणित न जुळत आल्याने मैदान सोडल्याची चर्चा सुरु होती. एमआयएम, आरपीआय, बसपा, अपक्ष मिळून ७७ मते होती. एकूण ६५७ मते होती ६४७ मतदान झाले होते त्यापैकी ६३३ मते वैध ठरली. कोटा ३१७ मतांचा होता. १० वाजून १७ मिनटांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी ५२४ मते घेतलेले अंबादास दानवे यांना विजयी घोषित केले. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून जल्लोष केला. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यावर आता शिवसेनेचे अंबादास दानवे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतील. सेनेने धडाडीच्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देऊन न्याय दिल्याची भावना शिवसैनिकातून उमटत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सेने- भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत परिश्रम घेतले.

 

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *