देवदहिफळच्या तरुणाचा विजेचा धक्का बसल्या तरुणाचा मृत्यू

ई पेपर बीड

 

 

दिंद्रुड प्रतिनिधी

 

दिंद्रुड पोलिस स्टेशन अंतर्गत धारुर तालुक्यातील देवदहिफळच्या युवकाचा शेतातील मोटार च्या डब्याला शाॅक लागुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

अधिक वृत्त असे की देवदहिफळ येथिल युवक राजेभाऊ रघुनाथ शेप यांचे दिंद्रुड येथे विहिरीतील मोटार दुरुस्ती चे दुकान आहे. दिंद्रुडच्या राजेभाऊ बसेट यांचे शेत शेप परिवाराकडे बटईने आहे. याच शेतातील विहिरीवरील मोटार बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या राजेभाऊ शेप यांना विजेचा जबर धक्का बसला असता गंभीर जखमी अवस्थेत माजलगाव येथिल खाजगी रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी राजेभाऊ शेप यांना मयत घोषित केले.

दरम्यान माजलगाव च्या शाशकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी प्रेत दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *