सौरऊर्जा प्रकल्पातील स्फोटात एक अभियंता ठार, दोघे जखमीजखमीं वर लातूर येथे उपचार सुरु

ई पेपर बीड
Spread the love

 

 

संतोष स्वामी । प्रतिनिधी

 

दिंद्रुड नजदीक चाटगाव येथील एका सौरऊर्जा प्रकल्पातील कंट्रोल रूममधील बॉक्समध्ये झालेल्या बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन एक अभियंता ठार तर दोघे कर्मचारी भाजून गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे सव्वादोन वाजताच्या सुमारास घडला. जखमींना स्वराती रुग्णालयात उपचार करून पूढील उपचारासाठी लातूर येथे हलविण्यात आले आहे .

धारुर तालुक्यातील चाटगाव येथील ‘तंले तुलाई सोलार प्रोजेक्ट ४’ नावाचा तिनशे सत्तावीस एक्कर क्षेत्रावर सौर उर्जा प्रकल्प आहे. शुक्रवारी पहाटे या प्रकल्पातील कंट्रोल रूम मधील आठ नंबरच्या बॉक्समध्ये अचानक बिघाड झाला होता. झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येत असतांना यात मोठा स्फोट होवून जाळ झाला . या वेळी अभियंता जयराज जया बालन (वय २७), तर रामानंद रामरतन खारवाल (वय २३) तामिळनाडू, संपत कमलाकर शिंदे (वय २३, रा. सिरसाळा) हे दोघे कामगार गंभीर जखमी झाले . या भीषण स्फोटात जयराज बालन १०० टक्के तर इतर दोघे ५० टक्के भाजले गंभीर भाजले होते . त्यांना तातडीने माजलगाव येथे नेण्यात आले .परंतु तेथे न घेतल्याने अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात दाखल केले . तिथे उपचारादरम्यान जयराज बालन याचा मृत्यू झाला. तर, शिंदे आणि खारवाल यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. या ठिकाणी दिवसभर तहसिलदार प्रशासन, विद्युत वितरण कंपणी, पोलीस अधिकारी यांनी भेटी दिल्या . या ठिकाणी पत्रकारांना जाण्यास सेक्युरेटीने मज्जाव केल्याने नेमकी घटना कशी घडली याची माहीती समजू शकली नाही. सोलार प्रकल्पाचे प्रमूख या ठिकाणी कोणीच नसल्याने प्रसार माध्यमांना घटनास्थळावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान सुरक्षा रक्षक बाळासाहेब सांगळे यांच्या फिर्यादीनुसार दिंद्रुड पोलिसांत आकस्मिक निधनाची नोंद करण्यात आली असुन पुढिल तपास दिंद्रुड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *