आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा निराधारास आधार

ई पेपर बीड
Spread the love

 

संतोष स्वामी l दिंद्रुड

आजकाल वाढदिवस म्हणजे फटाके फोडणे, हार तुरे, आणि झिंग झिंगाट याबेतावर तरलेल्या युवा पिढीला धारुर तालुक्यातील मोहखेडच्या नवतरुणाने छेद देत सामाजिक जाणिवेतून जन्मदिना निमित्त निराधार दिव्यांगास वस्त्र देत प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे.
मोहखेडचे पप्पु सोळंके हे सतत सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रमांतुन आपली वेगळी छाप सोडत असतात, लोकहितवादी कार्यात आनंद मानणारे सोळंके मोहखेड पंचक्रोशीतील जनसामान्यांचे आधारस्तंभ मानले जातात. पप्पु सोळंके यांनी एक माणूस एक झाड हि संकल्पना राबवत अनेकांना वृक्ष लागवड व संगोपनासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांनी स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने निराधार दिव्यांगांना वस्त्र अर्पण करत नवआदर्श निर्माण केला असुन मोहखेड वासीयांनी पप्पु सोळंके यांचे कोडकौतुक केले आहे.

“मी गरिबी काय असते ते डोळ्याने बघीतले असुन, निराधार अपंगाना मदत करताना मला आनंद होतो. “
-पप्पू सोळंके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *