वाचमन पित्याची मुलगी होणार डाॅक्टर नाकलगांवच्या मनिषाचा लागला एम बी बी एस साठी नंबर

ई पेपर
Spread the love

 

संतोष स्वामी। दिंद्रुड
माजलगांव तालुक्यातील नाकलगांव ची
कु मनीषा हनुमान भोसले हि निट परिक्षेत ५१० गुण घेत एम बी बी एस साठी पात्र ठरली आहे.सोलापूर येथील अश्विनी मेडिकल काॅलेजला मनिषा चा नंबर लागला आहे.
मनिषा चे वडिल माजलगाव सहकारी साखर कारखाना सुंदरनगर येथे वाचमन म्हणून काम करतात, घरची परिस्थिती अतिशय बेताची असुन मनिषाच्या वडिलांनी तिला शिक्षण दिले. धारुर तालुक्यातील तेलगाव येथे दहावी पर्यंत तर बारावी पर्यंत चे शिक्षण मनिषाने देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे घेतले आहे. शालेय शिक्षणा पासुन मनिषा तिच्या वर्गात प्रथम येत असे. वडिल अडाणी असताना मनिषा ने शिक्षणातून मिळवलेल्या या यशा बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. मनिषा हि माजलगाव तालुक्यातील नाकलगांव ची रहिवासी असुन तिच्या गावातील ती पहिली डाॅक्टर असणार आहे.

हनुमान भोसले यांना दोन मुली व एक मुलगा अशी तिन अपत्य असुन स्वत:ला गरीबीमुळे शिक्षण घेता आले नाही याची खंत मनात नेहमी सतावत असताना आपली मुले शिकली पाहिजेत या ध्येयापोटी मुलगा इंजिनिअर,मोठी मुलगी विज्ञान शाखेत पदवीधर, तर मनिषा या लहान मुलीस डाॅक्टर बनवायचे स्वप्न त्यांनी पुर्णत्वास नेले आहे.

तिच्या यशाबद्दल सिध्देश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. रमेश गटकळ, संजयगांधी निराधार समिती सदस्य पांडुरंग झोडगे, सरपंच विठ्ठल गवळी, उपसरपंच शेख पाशा, चंद्रकांत झोडगे, सुहास झोडगे यांनी अभिनंदन केले आहे.

 

“माझे प्रेरणास्त्रोत माझे वडिल असुन मी शिकत असताना वडिलांनी वेळोवेळी केलेेले मार्गदर्शन, त्यांनी घेतलेले परिश्रम डोळ्यासमोर ठेवून मी अभ्यास केला यामुळे मला हे यश मिळाले आहे.”

-मनिषा हनुमान भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *