परळीत भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

ई पेपर करिअर मंत्र बीड

करिअर मार्गदर्शक प्रा.शिवाजी कुचे व जितेंद्र बोरा यांचे होणार मार्गदर्शन


मराठवाड्यातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिशाहीन परिस्थिती आणि मार्गदर्शनाचा अभाव ही त्यापाठीमागची कारणे आहेत. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे तरूणांना करिअरच्या वाटा सापडत नाहीत. परंतू तज्ञांनी दाखविलेल्या मार्गवर वाटचाल केल्यास हमखास यश मिळतेच हे अनेकांचे पुर्वानुभव आहेत. याच पार्श्वभूमीवर परळीत येत्या २१ जुलै रोजी मराठवाडा स्तरीय रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अमरावती येथील अंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक व्याख्याते आणि समुपदेशक प्रा.शिवाजी कुचे व बेंगलोर येथील करिअर काऊंसेलर जितेंद्र बोरा यांचे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे.
मराठवाडा साथी मल्टीसर्व्हीसेस व टेक्नो ब्रेन सर्व्हीसेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीर होत आहे. परळी वैजनाथ येथील नाथ रोडवरील वैद्यनाथ औद्योगीक वसाहत येथे रविवार, दि.२१ जुलै रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये येथील अंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक व्याख्याते आणि समुपदेशक प्रा.शिवाजी कुचे व बेंगलोर येथील करिअर काऊंसेलर जितेंद्र बोरा यांचे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, विमा प्रतिनिधी, नित्यसंचय कर्मचारी, बँक कर्मचारी अशा विविध क्षेत्रात काम करणारे व संवादकौशल्या असणाऱ्या सर्वांना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

हि संधी गमावू नका
बालवयापासूनच मेंदूचा कल ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास कुठल्याही क्षेत्रात यश हमखास मिळत असते. मोठ्या मोठ्या शहरातील पालक आपल्या पाल्याविषयी सजग राहुन त्यांची ब्रेन मॅपींग टेस्ट हजारो रूपये खर्चून करतात. परंतू याची गरज आता ग्रामिण पातळीवरही निर्माण झाली असून, ब्रेन मॅपींग टेस्टची संधी परळीसह मराठवाडाभर उपलब्ध करून देण्यात आली आहे. डीएमआयटी ही एक अभिनव बुध्दीमत्ता टेस्ट असून, अतिशय अल्प दरात ती या कार्यक्रमात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही चाचणी केल्यानंतर आपल्या मेंदूचा कल तब्बल ४० पानी कलर रिपोर्टद्वारे ओळखल्या जाणार असून, तज्ञांचे याबाबत मार्गदर्शनही मिळणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम ही एक सर्वांसाठी नामी संधी आहे.

..अन्‌ मेडीटेशनचे धडे
परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीरात अल्प दरात डिएमआयटी टेस्ट तर उपलब्ध करून देण्यात आली आहेच. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द असलेले अमरावती येथील समुपदेशक प्रा.शिवाजी कुचे यांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. मेडीटेशन हे यशस्वी जीवनाचा मुलमंत्र असून त्याद्वारे माणसाला आत्मशांतीबरोबरच सकारात्मक उर्जा प्राप्त होते. चार तास चालणाऱ्या या कार्यक्रमात ध्यानधारणा आणि योगाबरोबरच मेडीटेशनचे धडेही मिळणार आहेत. महींद्रा आणि महींद्रा, यशदा यासारख्या नामांकीत कंपन्यांमध्ये प्रा.शिवाजी कुचे यांची प्रत्येक महिन्याला कार्यक्रम होत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *