झारखंड ‘मॉब लिचिंग’ प्रकरणी दिंद्रुड येथे मुकमोर्चा संपन्न

ई पेपर बीड
Spread the love

 

 

संतोष स्वामी। दिंद्रुड प्रतिनिधी

 

झारखंड राज्यातील तबरेज अन्सारी या मुस्लीम युवकास मारहाण करत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.  या घटनेच्या निषेधार्थ व मुस्लिम अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू करण्यात यावा आदी मागण्या विषयी सकल मुस्लिम समाजासह सर्व पक्षीय व सर्व धर्मीयांच्यावतीने भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

देशभरात मागील कांहीं वर्षांपासून मॉबलिंचिंगचे प्रमाण वाढले आहेत. यात केवळ संशयावरून निष्पाप मुस्लिम बांधवांना अमानुषपणे मारहाण केली जात असून अनेकजण मॉबलिंचिंग मध्ये मृत्युमुखीही पडले आहेत. नुकतेच झारखंड राज्यात तबरेज अन्सारी या निष्पाप मुस्लिम युवकाचा मॉबलिंचिंग प्रकरणात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून तिव्रस्वरूपात निषेध व्यक्त केला जात आहे. दिंद्रुड शहरातही आज (दि.२९ जुन) रोजी जुन्या बस स्थानका पासुन बीड परळी हायवे पर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला.यावेळी मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार डाॅ प्रतिभा गोरे यांच्या माध्यमातून भारताचे राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर केले. निवेदनात तबरेज अन्सारी हत्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, मुस्लिम अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

मुक मोर्चात दिंद्रुड शहरातील सकल मुस्लिम समाजासह सर्व धर्मीय समाज बांधव, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांसह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *