दिंद्रुड च्या कटारे चे आगीत घर भक्षस्थानी

ई पेपर
Spread the love

 

संतोष स्वामी । दिंद्रुड प्रतिनिधी

येथील महादेव जर्नाधन कटारे यांचे काल शुक्रवारी देवघरातील लावलेल्या दिव्यामुळे कुडाच्या घराला आग लागुन संसार जळुन खाक झाल्याची घटना घडली.

सद्या पेरणीचे दिवस असल्याने सकाळी कटारे कुटुंब शेतात गेले होते. देवघरातील दिव्यामुळे घरातील अन्नधान्य, शेतीचे ३० पोते खत, पेरणीसाठी ठेवलेले १५०००रु.रोख,कपडेलत्ते आदी अंदाजे एक लाख रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाले.
महादेव कटारे यांच्या परिवारावर अख्खे घर जळाल्याने उघड्यावर रहाण्याची वेळ आली आहे. आदीच दुष्काळामुळे पिचलेल्या शेतकर्यावर अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान दिंद्रुड सज्जाचे तलाठी भट्टे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असुन कटारे यांच्यावर भर पेरणीत मोठे संकट कोसळल्याने प्रशासनाने तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *