तीन दशकांपासुन धरणात गेलेले शिवलिंग पुन्हा प्रकटले

ई पेपर बीड
Spread the love

संतोष स्वामी। दिंद्रुड

वडवणी व धारूर या दोन तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या कुंडलिका धरणातील पाणीसाठा तीन दशकानंतर यंदा प्रथमच कमी झाल्याने, या धरण क्षेत्रात गेलेल्या नागझरी या गावातील पुरातन महादेव मंदिरातील शिवलिंग पुन्हा प्रकटले असुन, यासोबतच कांही वृक्षही उघडी पडली आहेत.
यासंदर्भात वृत्त असे की, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते सुंदररावजी सोळंके यांनी पुर्वीचा माजलगाव तालुक्याचा भाग असलेल्या उपळी व इतर गावात हरितक्रांती घडवण्यासाठी उपळी येथे कुंडलिका धरणास मंजुरी आणुन, त्याचे काम जलद गतीने केले होते. हे धरण उभारताना उपळी लगतच असलेले नागझरी हे पुर्णपणे उठले होते तर धुनकवड गावचा कांही भाग धरण क्षेत्रात गेला होता. त्यामुळे नागझरी या गावचे पुर्नवसन इतरञ करण्यात आले होते. तर धुनकवडचे जवळच स्थालांतर केले होते. धरण क्षेत्रात गेलेल्या नागझरी गावात पुरातन शिवमंदिर होते. हे जागृत देवस्थान म्हणुन ओळखले जाते होते. त्यामुळे येथे दर्शनासाठी भाविक येत.माञ धरण क्षेत्रात पुर्ण गावच गेल्याने त्यासोबत शिवमंदिर ही गेले होते. कुंडलिका धरण पुर्ण झाल्या पासुन हे धरण कायम भरलेले होते. जवळपास तीस वर्षे म्हणजे तीन दशकांपासुन कुंडलिका धरण कायम तुडुंब भरलेले होते. मात्र गतदोन वर्षांत पाऊसकाळ कमी झाल्याने या धरणातील पाणीसाठा कमी होत गेला. यावर्षी तर कुंडलिकात खुपच पाणीसाठा कमी झाल्याने या धरण क्षेत्रात गेलेल्या नागझरी गावचा बहुतांश भाग उघडा पडला असुन, यात नागझरीचे पुरातन मंदिरातील शिवलिंग ही उघडे पडले आहे. तसेच मंदिरा जवळ असलेले मोठमोठे वृक्ष ही उघडे पडले आहेत. तीन दशकानंतर यंदा प्रथमच धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने ही मोठी चिंतेची बाब आहे .अशी चर्चा नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *