लोकसभा निवडणुकीतील भाकीत तंतोतंत खरे ठरल्याने बडेंचे सर्वत्र कौतुक

ई पेपर बीड
Spread the love

दिंद्रुड। प्रतिनिधी

माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील अमन पब्लिक स्कुल चे संचालक तथ पत्रकार सुर्यकांत बडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर वर्तविलेले भाकीत तंतोतंत ठरल्यानंतर जिल्हाभरातून त्यांनी मिडियावरती वर्तीवलेला अंदाजाचे कौतुक होत आहे.सुर्यकांत बडे यांनी मतदान होण्या आगोदर च म्हणजे दि.15एप्रिल लाच पंकजाताई व प्रितमताई ला सोशल मिडिया वरती सांगितले होते की आपल्या बीड जिल्ह्यात 1356207 एवढे मतदान होईल.तो आंदाज खरा ठरत एकुण मतदान 1348473एवढे झाले. त्यानंतर 29एप्रिल लाच परत पंकजाताई व प्रितमताईंना सोशल मिडिया वरती पाटवलेला अंदाज असा होता की, 1 लाख 75 हजार 346 ऐवढ्या मताधिक्याने प्रितम मुंडे निवडून येतील हे त्यांनी भाकित केलं होते. दरम्यान निकाल हाती पडल्यानंतर वर्तविलेल्या अंदाजाचे कौतुक जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व नवनिर्वाचित खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केले आहे.
या संदर्भात आधिक माहिती असी की,सुर्यकांत बडे हे भाजपचे सामान्य कार्यकर्ते म्हणुन ओळखले जात असले तरी बीड जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात 2009पासुन काम करत आहेत. मुंडेसाहेबांचे भक्त म्हणुन त्यांची विशेष ओळख आहे. बडे हे स्व.गोपीनाथराजी मुंडेसाहेबांना दैवत मानुन आपल्या जिवनातील दरोजची सुरूवात त्यांच्या दर्शनाने करतात. बडे यांना कमी वयातच बीड जिल्ह्यातील सर्व मतदारसंघ, गावनिहाय, जातनिहाय त्यांना राजकियदृष्ट्या अभ्यास आहे. यापुर्वी लोकसभा असो किंवा विधानसभा असो त्यांचे अंदाज अनेकदा खरे ठरले. काल पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय होणार? याकडे जिल्ह्यांचे लक्ष लागले होते. निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर जातीपातीचा आधार घेवुन निवडणुक चुरशीची झाली आणि काट्याची टक्कर आहे अशा प्रकारची भीती चर्चेतुन पुढे आणली होती. मात्र सुर्यकांत बडे यांनी मतदान झाल्यानंतर एकुण दोन वेळा वेगवेगळे अंदाज वर्तविणारे आंदाज सोशल मिडिया वर व स्वतः ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा आपल्या जिल्हाच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे व विद्दमान खासदार प्रितमताई मुंडे यांना पण निकालाच्या आगोदरच पाटवले होते. 1) ओबीसीच्या पोतडीतुन डॉ.प्रितमताईचा विजय बाहेर पडणार, 2) बंद मतपेटीतील सत्य, डॉ.प्रितमताईचा विजय असा असेल या काढलेल्या अंदाज त्यांनी निवडणुक निकालाचं विश्लेषण करताना ही निवडणुक विकासाच्या मुद्यावर तर झालीच.त्यातही ओबीसीविरूद्ध मराठा आणि त्यातुन निकाल हे सांगताना डॉ.प्रितमताई मुंडेंना एकुण7 लाखा पर्यंत मते पडतील व त्या 1 लाख 75 हजार 346एवढे मताची लीड घेऊन निवडून येतील. अशा प्रकारचा अंदाज वर्तविलेला होता. मराठा जातीवादा विषयी दबक्या आवाजात जोरदार चर्चा करून विरोधकांनी निर्माण केलेले वातावरण यावरही बीड जिल्ह्यातील 35 टक्यापेक्षा अधिक मराठा समाज नेहमीच मुंडे घराण्याच्या पाठीमागे अर्थात भाजपाचा पारंपारीक असल्याचे त्यांनी म्हटले होते. प्रत्येक मतदारसंघातुन मताधिक्य मिळेल असेही त्यांचे भाकित होते. सुर्यकांत बडेंनी हे वर्तीवलेला अंदाज सोशल मिडिया वरती पहाता त्यांना खास भेटण्यासाठी व नेमका आंदाज कसा प्रकारे वर्तीवलेला आहे हे पाहण्यासाठी बडेंची भेट 1मेला त्यांच्या शाळेवर गडदेवाडी ता.परळीचे सरपंच व स्व.मुंडेसाहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते संतराम गडदे,चोपनवाडीचे वनवे बापु,शिवाजी बडे ह्यांनी भेट घेऊन आंदाज पहाता 1मेलाच गुलाल उधळला होता,या आगोदर बडेंनी आपला आंदाज प्रितमताई मुंडे यांचे निकटवर्तीय आसणारे दुर्गादास लांब, जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे,धारूर तालुक्यातील युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष गणेश बडे,इंजेगाव येथील ग्रा.पं.सदस्य दत्ता कराड,मराठी पत्रकार परिषदेचे मिडिया सेल प्रमुख संतोष स्वामी यांच्या सह अनेकांना सोशल मिडियावरती पाटवला होता.दि23 मे रोजी संपुर्ण निकाल बाहेर आला तेव्हा प्रितमताई मुंडे ह्या 1लाख 77हजार 829 ऐवढ्या मतांनी विजयी झाल्या ,त्यानुसार बडेंनी वर्तविलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला असल्याचे बोलले जात आहे. सोशल मिडिया, फेसबुक यावरही त्यांचा वर्तीवलेला आंदाज वाचकांनी वाचले होते. त्यांचे अचुक राजकिय विश्लेषण सत्यात उतरल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि नवनिर्वाचित खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी कौतुक करून अभिनंदन केले. सुर्यकांत बडे आता केवळ पत्रकार नव्हे तर भविष्यकारही होवु शकतात अशी प्रतिक्रिया खासदारांनी दिली.तसेच गडदेवाडी चे सरपंच संतराम गडदे,जिल्हा बँकेचे संचालक बाबरी मुंडे,नित्रुड येथील शेख चाँदसाब,धारुर तालकाध्यक्ष गणेश बडे,पत्रकार दुर्गादास लांब,संतोष स्वामी,चोपनवाडीचे वनवे बापु,आर्जुन तातोडे ,पत्रकार हनुमान बडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दुरध्वनीवर संपर्क करून सुर्यकांत बडेंचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *