संगम येथिल अपह्रत मुलीचे प्रेत सापडल्याने खळबळ

ई पेपर बीड
Spread the love

 

 

दिंद्रुड। प्रतिनिधी

 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विहीरीत स्त्री जातीचे कुजलेले प्रेत आज सकाळी सापडले असुन परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशन अंतर्गत धारुर तालुक्यातील भोपा शिवारात विजय बळीराम वाघचौरे यांच्या शेतातील विहिरीत संगम येथिल साक्षी दत्तात्रय आंधळे या पंधरा वर्षीय मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आले. भोपा येथिल पोलिस पाटील वाघचौरे यांनी दिंद्रुड पोलिसांना माहिती दिली असता तात्काळ घटनास्थळी दाखल होत प्रेत विहिरी बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. साक्षी आंधळेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती.अंबाजोगाई येथिल शाशकीय रुग्णालयात प्रेत शवविच्छेदनासाठी नेले असुन संगम परिसरात मुलीची हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क सुरु होते.

दरम्यान मयत साक्षी दत्तात्रय आंधळे च्या वडिलांनी दि २२ रोजी रात्री माझी मुलगी साक्षीचे दि २१ रोजी सकाळी दिंद्रुड येथील खाजगी शाळेतील शिक्षक विठ्ठल बालासाहेब कराड याने अपहरण केल्याचा गुन्हा दिंद्रुड पोलीस ठाण्यात दाखल केला होता. नातेवाईकांच्या आरोपावरून साक्षी आंधळे हि इयत्ता नववीत शिकत होती.तिला वेळोवेळ मोबाईल ला संदेश पाठवणे,वाढदिवसाला घडी भेट देणे,पाचशे रुपये देणे असे कृत्य आरोपी विठ्ठल कराड करत असल्याचे फिर्यादीत नोंद आहे.तुझ्या सोबत लग्न करतो तुला सांभाळतो म्हणून फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार

दाखल आहे.दिंद्रुड पोलिसांत गुन्हा रजि. नं.००९८/१९ कलम ३६३ भांदवी नोंद असुन पोलिसांनी विठ्ठल कराड यास ताब्यात घेतले आहे.पुढिल तपास सपोनी सचिन पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नि. युवराज टाकसाळ, लोंढे, रवि केंद्रे करत आहेत.

घटनास्थळी मयत साक्षी च्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत मुलीचा खुन झाला आसल्याचे सांगत दिंद्रुड पोलीसांना आरोपी वर हत्याचा गुन्हा दाखल करण्यात येण्याची मागणी जोर लावत धरली होती. दिंद्रुड पोलीसांनी तणाव कमी करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात येण्याची हमी दिल्याने तणाव निवाळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *