सोनिमोहा येथे देवदर्शनापूर्वी वधू वराचे श्रमदान

ई पेपर बीड
Spread the love

विश्वास शिणगारे I धारूर
लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला जाण्यापूर्वी सोनिमोहा येथील वधूवरांनी डोंगरावर समतल चर खोदण्यात आला .नियमित श्रमदान करणाऱ्या तरूणाने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी श्रमदान केल्याने इतर तरूणांना श्रमदानासाठी प्रेरणा मिळाली .
सोनिमोहा हे गाव बालाघाटाच्या डोंगर कुशीत वसलेले आहे .एके काळी मुबलक पाणी असलेल्या गावात या वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पुरवठा करण्यात येत आहे . येथील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी येथे वॉटर कप स्पर्धा सुरू केली आहे . सध्या या गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे . येथील पिण्याच्या पाण्याचा कायमचा पिण्याच्या प्रश्न सुटावा म्हणून ग्रामस्थांसह ३० ते ४० तराण नियामत धडपड करित आहेत . स्पर्धा सुरू झाल्यानंतर सकाळी कोंबडयाने बांग देताच महिलासह ग्रामस्थांचे पाऊल श्रमदानाच्या दिशेने निघतात . गावात श्रमदान असणाऱ्या दिशेन हलगी वाजविण्यात येते . गावातील तरुण एकत्र येवून टिकाव, खोरे, टोपले आदी साहीत्य घेवून श्रमदानाच्या दिशेने निघतात .डोंगरावर जाऊन सलग समतल चर खोदण्याचे काम करण्यात येत आहे . दुष्काळ मुक्तीसाठी गाव पेटून उठले आहे . नियमित श्रमदान करणारे ब्रम्हदेव मदन तोंडे यांचा मंगळवारी विवाह पार पडला .विवाहाच्या दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला जायचे होते .परंतु देवदर्शनाला जाण्यापुर्वी या नवदापंत्यांनी डोंगरावर येवून सलग समतल चर खोदण्यासाठी श्रमदान केले . दोघांनी खोदून खड्डा पूर्ण केल्यानंतरच देवदर्शनाला गेले .नवदा पंत्याच्या या उपक्रमामुळे उपास्थित श्रमदात्यांकडून त्यांचे कौतूक होत होते .
==
कायम दुष्काळ मुक्तीची संधी
वॉटर कप स्पर्धाचा कालावधी बारा दिवस राहील्याने सोनिमोहा पाणी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे यांनी मंगळवारी सायंकाळी ग्रामस्थांची बैठक घेवून मार्गदर्शन केले . उर्वरीत कालावधीत दुष्काळ मुक्तीच्या मिळालेल्या संधीच सोन करावे असेही त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *