किराडपुरा येथील मंदिरात श्रीरामजन्मोत्सव उत्साहात

औरंगाबाद

खा. चंद्रकांत खैरे आ. अतुल सावेंच्या हस्ते महाआरती

औरंगाबाद/प्रमोद अडसुळे : रामनवमी निमित्ताने शहरातील किराडपुरा येथील राम मंदिर मध्ये खा. चंद्रकांत खैरे व आ.अतुल सावे तसेच शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी १२ वाजे दरम्यान महाआरती करण्यात आली.
शहरातील अनेक वर्षे जुने व प्राचीन मंदिर असलेले किराडपुरा येथील राम मंदिरात शनिवारी दुपारी बारा वाजता श्रीरामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे यांनी आरती केली. त्यांच्या सोबत मा. आ. प्रदीप जैस्वाल, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती राजू वैद्य, अनिल मकरिया, नगरसेवक मकरंद कुलकर्णी, विश्वनाथ स्वामी, प्रशांत नांदेडकर, किराडपुरा श्रीराम मंदिर कमेटीचे अध्यक्ष मानसिंग बापू पवार, दयाराम बसय्ये बंधू , सचिव उत्तम मनसुटे,लक्ष्मीकांत थेटे, विकास पाटील, गणेश जोशी, सुनील खोचे, मंगलमूर्ती शास्त्री, नितीन खरात उपस्थित होते. मंदिर परिसरात भजन, कीर्तन, रक्तदान शिबिर आयोजित केले होते. युवकांनी दुचाकीवरून वाहन रँली काढत सर्व मंदिर परिसरात जय श्रीराम नामाच्या जोरदार घोषणा दिल्या.

Tagged

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *